मोटारसायकल धडकून जतमध्ये युवक ठार

0
2
जत: मोटार सायकलवरून राजेंद्र मळगे जवळील लोखंडी गार्डला धडकून राजेंद्र तुकाराम मळगे (वय ३७, रा.मळगेवस्ती, जत) हे जागीच ठार झाले.ही घटना शनिवारी दुपारी घडली.विजयपूर-गुहागर महामार्गावर जतपासून किलोमीटर घरी जात असताना जत एमआयडीसी अंतरावर कारखान्यासमोर मळगेवस्ती आहे.मृत राजेंद्र हे जतमध्ये मोटरसायकल (एम.एच. ०८- ए. व्ही. ७१७३) घरी जात  होते.एमआयडीसी जवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी गार्डला मोटारसायकल धडकली.
त्यावेळी त्यांच्या डोक्यास मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. मृत राजेंद्र हे चालक म्हणून काम करीत होते.याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here