शिवसेनेच्या वतीने संख गावामध्ये मोफत पाणी वाटप

0

संख,(रियाज जमादार)

जत तालुका संख येथे शिवसेनेच्या वतीने संख गावामध्ये मोफत टँकरने पाणी वाटपचा प्रांरभ संख विरक्त मठाचे मठाधिपती महेश देवरु यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी शिवसेना विधानसभा अध्यक्ष प्रविण आवरादी,शिवसेना उपतालुका प्रमुख श्रीमंत करपे श्रीशैल आवरादी,भीमराव बिरादार, यांच्या उपस्थित मोफत टँकरने पाणी वाटप सुरु करण्यात आले.

संख येथे शिवसेना विधानसभा अध्यक्ष प्रविण आवरादी यांनी बोलतांना म्हणाले की,संख गावचे सध्या

परिस्थिती पाणी उशाला…

Rate Card

कोरड घशाला…

अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.या परिस्थितीत कारणीभूत संख ग्रामपंचायत निष्क्रिय पद्धतीने काम करत आहे.संखचे तलाव हे सांगली जिल्ह्यात सर्वात मोठा साठवण क्षमता आहे. संख येथील मध्यम प्रकल्प तलाव हे 75 टक्के पाणी भरले असून संख गावातील नागरिकांना पिण्याचा पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.वीस हजार हुन अधीक लोकसंख्या असलेले गाव आहे.संख ग्रामपंचायत च्या वतीने गावात दर दीड महिन्यांनी नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. असे मत शिवसेना विधानसभा अध्यक्ष प्रविण आवरादी यांनी केले आहे.

 

वास्तविक परिस्थिती पाहून शिवसेनेच्या वतीने मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित संख गावचे विरक्त मठाचे मठाधिपती महेश देवरु,शिवसेना विधानसभा अध्यक्ष प्रविण आवरादी,शिवसेना उपतालुका प्रमुख श्रीमंत करपे
श्रीशैल आवरादी,भीमराव बिरादार संतोष बिरादार मंजुनाथ पुजारी सुमित चव्हाण बिराप्प्पा मुर्गे चनबसू गुजरे गुरु पुजारी महेश बागेली हणमंत जत्ती संगप्पा बगली खाज्या व्हनमराठे रवी व्हनमराठे अन्नपा ठोभरे अंकुश ठोभरे महानतेश पाटील राजु लेगरे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.