जत,संकेत टाइम्स : जत नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे जत शहराच्या मध्यभागातून वाहणारे गंधर्व ओढापात्रात अतिक्रमणे व मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे उगवल्याने या झुडुपात ओढापात्रच गायब झाले आहे,यामुळे पावसाळ्यात धोका निर्माण झाला आहे.
जत नगरपरिषदेतील तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी जत शहरातून नैसर्गिकरीत्या वाहणारे ओढापात्रातील झाडे झुडपे काढून या ओढापात्रात नगरोत्थान योजनेतून कोट्यावधी रूपये निधी खर्च सिमेंट काँक्रीटचे नाला बांधकाम केले आहे.
हे बांधकाम तत्कालीन नगरपरिषदेतील काही नगरसेवकानी ठेकेदाराच्या नावाखाली केले आहे.यामुळे ओढापात्राचे मुख्य अस्तित्व
गायब झाले आहे.कमिशन खोरीला चाटावलेले पदाधिकारी, अधिकारी यांनी नगरपरिषदेचा बाजार मांडला आहे. नागरिकांच्या हिताच्या योजना सोडून तिसरीकडे मोठ्या प्रमाणात निधीची उधळपट्टी करून लोकांच्या कर रूपात गोळा झालेला निधी वाया घालविला आहे.
जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे ओढापात्र असून या ओढापात्रातील झाडे,झुडपे व ओढापात्रातील गाळ काढून हे ओढापात्र स्वच्छ ठेवता आले असते.परंतु गेल्या नऊ वर्षात ओढापात्रातील झाडे काढण्याचेही धारिष्ट नगरपरिषदेने दाखविलेले नाही.परिणामी मुख्य शहरातून वाहनारा एक नाला,गंधर्व ओढापात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेचं,त्याशिवाय स्वच्छेचा डांगोरा फिटणाऱ्या नगरपरिषदेचे पितळ उघडे पडले आहे.स्वच्छतेच्या नावावर कोट्यावधीचा निधी पदाधिकारी व पालिका प्रशासनाने फस्त केला आहे. मात्र शहरातील हे ओढापात्र व नाले दुर्गंधी पसरविणारे ठरत आहेत.
ओढापात्रात सिमेंट काँक्रीट नाल्याचे अस्तरीकरणाचे काम केले असतानाही ओढापात्रात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे उगवून आली आहेत.त्यामुळे ओढापात्र या काटेरी झुडपात गायब झाल्याचे दिसून येत असून ऐन पावसाळ्यात या ओढापात्रातील या झाडाझुडपामुळे जत शहरवासियांना मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागणार आहे.
त्यामुळे या जत नगरपरिषदेने नगरोत्थान योजनेतून केलेल्या ओढापात्र खोलीकरण, रूंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण व अस्तरीकरणाचे कामाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जत शहरवासियातून व पर्यावरण प्रेमीकडून करण्यात येत आहे.
जत शहरातून वाहणाऱ्या गंधर्व ओढापात्र अशा काटेरी झाडे वनस्पतीने व्यापले आहे.