विनापरवाना खताचा साठा,कृषीच्या भरारी पथकांची कृषी केंद्रावर मोठी कारवाई

0सांगली : सांगली येथे विना परवाना खताचा 21 लाख रूपयाचा साठा जप्त करत जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकांने मोठी कारवाई केली आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून ऐन हंगामात मागणी वाढलेली असताना विना परवाना खते विकणारी टोळी जिल्ह्यात कार्यरत आहे.


खरीप हंगाम सन 2021 मध्ये शेतकऱ्यांना खते रास्त दरात व गुणवत्ता पूर्ण उपलब्ध करुन देण्याकरिता तसेच विक्रेत्यांनी या निविष्ठांची शेतकऱ्याना जादा दराने खते विक्री करू नये,खतांचा काळाबाजार करू नये तथा भेसळ युक्त खते शेतकऱ्यांना विक्री होऊ नये या सांगली जिल्ह्यात कृषी विभागाने 11 भरारी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत.

शनिवार दि.12 रोजी सांगली शहरामध्ये ग्लोबल इम्पोर्टस पत्ता शॉप न.2.गजाजन कॉलोनी,द.ओरीअन अपार्टमेंट जुना कुपवाड रोड सह्याद्री नगर सांगली येथे ग्लोबल इम्पोर्टसचे मालक तोसिफ नसीर मार्फानी रा. सांगली हे शेतकऱ्यांना व किरकोळ उत्पादकांना तसेच काही कृषी सेवा केंद्राना अनाधिकृतपणे सूक्ष्म अन्नद्रव्ये विकतात याची गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळालेवरून 

शनिवारी सकाळी साडेेेदहा वाजता जिल्ह्यास्तरीय भरारी पथकाने ग्लोबल इम्पोर्टसच्या कार्यालयात माग्नेशीअम सल्फेट,फेरस सल्फेट,सल्फर,बोरॉन , झिंक सल्फेट,कॅल्शीयम नायट्रेट या सूक्ष्म अन्नद्रव्यांची / खतांची नमुने भरारी पथकास आढळून आली. 

ग्लोबल इम्पोर्टसच्या कार्यालयाच्या शेजारील गाळा नं.2 मध्ये कॅल्शीयम नायट्रेट 2 मे.टन,सल्फर 99.9 टक्के 2 मे टन , सल्फर 90 टक्के, झिंक सल्फेट 400 किलो, फेरस सल्फेट 2 मे.टन,माग्नेशीअम सल्फेट 50 किलो,बोरॉन 2 मे टन तसेच सिलिकॉन गोळी 5 मे.टन,सिलिकॉन पावडर 10 मे.टन,हुमिक फ्लेक्स 30 मे.टन बेन्टोनेट गोळी 30 मे. टन असा एकूण तब्बल 84 मे.टन 350 किलो इतका साठा ग्लोबल इम्पोर्टसच्या शेजारील गाळा नं.2 , तसेच समोरील हमीद इमारतीच्या तळघरात व तिरुमला पार्क गाळा नं.5 पत्ता लवली सर्कल रोट सांगली येथे आढळून आला . सदरच्या मुद्देमाला पैकी सुक्ष्म अन्नदव्ये यांचे अंदाजे किमत 4 लाख‌10 हजार सहाशे रूपये,व इतर अनुषंगिक मुद्देमाल अंदाजे किमंत 16 लाख‌ 50 हजार असा 20 लाख 60 हजार रूपये किंमतीचा आढळून आला आहे. 

Rate Card


ग्लोबल इम्पोर्टसचे मालक तोसिफ नसीर मार्फानी रा . सांगली यांच्याकडे भरारी पथकाने विक्री परवाना व खरेदी पावत्या मागणी केली असता त्यांनी सादर नाही नाही सविस्तर चौकशी अंती कोणत्याही प्रकारचा परवाना स्वीकृत करुन न घेतल्या बाबत त्यांनी स्वतः दिलेल्या कबुली नुसार वरील सुक्ष्म अन्नद्व्यापैकी फेरस सल्फेट , सल्फर ,बोरॉन,झिंक सल्फेट,कॅल्शीयम नायट्रेट वा सुक्ष्म‌ अन्नद्रव्याचे / खतांचे संशयित नमुने सर्व पंचासमक्ष व स्वत : मालक यांचे समोर घेऊन ते सिलबंद करून संबंधित विनापरवाना खताचे नमुने शासकीय खत तपासणी प्रयोगशाळा  येथे तपासणी करिता सादर करण्यात आला आहे.भारतीय संहित 1860 कलम 420 ब खत नियत्रंण आदेश 1985 सुधारणा 2018 व 2019 मधील खंड 7 फॉर्म बी मधील अट व शर्त क्र.4, खत नियंत्रण आदेश खंड 25 (3) नुसार,खंड 8,खंड 3,बंड 12, खंड 11, खंड 21, खंड 35 ( 1 ) ( ए ) व जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील 3 (2 ) ( डी)व जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील 7 ( 1 ) ( ए ) ( ए ) अन्वये संबंधितावर संजय नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील यांनी यासंबंधी तक्रार दिली.जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री सुरेंद्र पाटील,मोहिम अधिकारी श्री धनाजी पाटील याांच्या पथकांने कारवाई केली त्याबाबतचा गुन्हा संजय नगर पोलीस ठाणे येथे दाखल झाला असून याप्रकरणी पुढील तपास  पोलीस उप निरीक्षक महेश डोंगरे करत आहेत.


सांगली येथे कृषीच्या विभागाच्या‌ भरारी पथकांने विना परवाना पकडलेले खताचा साठा


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.