घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, विराट गिरी यांना ‘पीएचडी’ पदवी प्रधान  

0
Rate Card
संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, विराट वसंतराव गिरी यांना नुकतीच विश्वेश्वर्या टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाकडून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विद्याशाखेमध्ये पीएचडी ही मानाची पदवी प्राप्त झाली आहे.
“एनहानसिंग परफॉर्मन्स ऑफ टेक्स्ट  समरायझेशन अँड एक्सट्रॅकशन ऑफ इन्फॉर्मशन इन डिसिजन मेकिंग फॉर रिजनल लँग्वेजेस” हा त्यांचा पीएचडीचा मुख्य विषय होता. डॉ. मल्लिकार्जुन मठ  यांचे मोलाचे मार्गदर्शन या संशोधन कार्यास लाभले आहे.

नैसर्गिक भाषा प्रक्रियेच्या क्षेत्रातील डॉ. गिरी यांनी एक सॉफ्टवेअर अप्लिकेशन तयार केले आहे. या सॉफ्टवेअरचा वापर करून मजकुरातील महत्त्वाची माहिती एका लहान आवृत्तीमध्ये संक्षेपित करण्याची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत, मुख्य कल्पना ओळखल्या जातात आणि वापरासाठी संबंधित तपशील प्रदान केले जातात.

त्याबरोबरच मोठ्या वाक्याचे अर्थपूर्ण लहान वाक्य तयार करण्यासाठी हे सॉफ्टवेअर कार्य करत आहे.  या सॉफ्टवेअरचे पेटंट मिळविण्यासाठीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे.
भारतीय प्रादेशिक भाषा मधील मजकूर सारांशीकरणातील संशोधन फारच मर्यादित आहे. आणि ते अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. डॉ. गिरी यांच्या संशोधनामुळे भारतीय भाषांमधील मजकूर सारांशीकरणाच्या क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय असणार आहे.

डॉ. विराट गिरी यांचे शिक्षण एम टेक कॉम्प्युटर भारती विद्यापीठ पुणे येथे पूर्ण झालेले आहे.  त्यांनी २०१२ पासून प्राचार्य, संजय घोडावत पॉलिटेक्निक, या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्याचप्रमाणे संचालक संजय घोडावत  ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस कोल्हापूर, संचालक संजय घोडावत रेसिडेन्सी अकॅडमी कोल्हापूर, संचालक संजय घोडावत इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अतिग्रे, तज्ञ करिअर समुपदेशक आजपर्यंत करिअर व व्यक्तिमत्व विकास दहावी आणि बारावी नंतरच्या करिअर वाटा, स्पर्धा परीक्षेमधील संधी व आव्हाने अध्ययन व अध्यापन कौशल्य, संस्कार स्वरूपी शिक्षण, उद्योग व व्यवसाय, शैक्षणिक व्यवस्थापन कौशल्य, शिक्षण आणि शिक्षण व्यवस्था, सकारात्मक अभिरुद्धी विद्यार्थी व पालक इत्यादी अनेक विषयावर प्रबोधनात्मक व प्रोत्साहन पर ११०० हून अधिक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत.

डॉ.गिरी यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकेमध्ये सात शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून दोन पेटंट  प्रसिद्ध झालेली आहेत. डॉ. गिरी यांना नवोदय विद्यालयाचे गुणवत्ता विद्यार्थी, डॉक्टर सुजित मिंचेकर फाउंडेशन कडून ‘आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार’, पाणी फाउंडेशन ‘जलरत्न पुरस्कार’, स्वाभिमानी शिक्षक संघाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ आय एस टी इकडून ‘बेस्ट पॉलीटेक्निक प्राचार्य’ पुरस्कार, टुडे रिसर्च अँड रेसिंग नवी दिल्ली या संस्थेमार्फत ‘बेस्ट अपकमिंग पॉलीटेक्निक पुरस्कार’ नॉलेज रिहू मासिकाकडून भारतातील टॉप टेन पॉलीटेक्निक मधील एक पॉलीटेक्निक म्हणून गौरव प्राप्त झालेले आहेत.  सामाजिक कार्यामध्ये गिरी यांनी कार्यतत्पर जबाबदार व पारदर्शी प्रशासनाचा ठसा उमटलेला आहे.

या संशोधनाबद्दल बोलताना  डॉ. गिरी म्हणाले या संशोधनातून हे तंत्र मराठी भाषांमधील माहितीचे संक्षिप्त सारांश तयार करण्यासाठी वापरले जाईल . सामान्यतः, मजकूर सारांश प्रक्रियेमध्ये संकल्पना गोळा करणे , त्यांचे महत्त्व ओळखणे, मुख्य कल्पनांना प्राधान्य देणे आणि सर्वात उपयुक्त माहिती निवडणे यांचा समावेश होतो. नैसर्गिक भाषा मधील वाक्यांचा सारांश करणे  हे सॉफ्टवेअर-अप्लिकेशन निर्माण करणार आहे. हे कौशल्य विद्यार्थ्यांना व सर्वसामान्यांना अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. माझ्या या यशामध्ये माझे कुटुंबीय, सर्व सहकारी, मित्रपरिवार व घोडावत मॅनेजमेंटचे सहकार्य लाभले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा देऊन सन्मानित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.