केंद्रीय मंत्री रामदास आठवले जूलैमध्ये जत‌ दौऱ्यावर | नियोजन तयारी सुरू | विविध विकास कामांचे शुभारंभ होणार 

0
जत : आर.पी.आय.(आ) चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक कांबळे यांचे उपस्थितीमध्ये जत तालुका कार्यकर्ता संवाद बैठक मेळावा संपन्न झाला.केंद्रीय मंत्री डॉ.रामदास आठवले यांचा जत दौरापुर्व नियोजनासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रीय मंत्री डॉ.रामदास आठवले यांचा जूलै महिन्यामध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यासाठी जत तालुक्यामध्ये नियोजित दौरा आयोजित आहे.या दौऱ्यांच्या पुर्व नियोजना करीता रिपब्लिकन (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जत वाचनालय भवन येथे हि बैठक झाली.यावेळी बैठकीचे अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान कार्याध्यक्ष संजय कांबळे प्रमुख उपस्थित होते. यावेळी विवेक कांबळे रिपाइं(आ.) जत तालुका कार्यकारणीचे वतीने शाल अर्पण करून व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करणेत आला.
सर्वप्रथम सर्व महापुरूषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.

 

बैठकीचे प्रास्तविक जत तालुका अध्यक्ष संजय कांबळे/पाटील यांनी केले.यावेळी उपस्थित जत तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.संजय कांबळे म्हणाले, रिपब्लिकन पक्ष हा भारतातील सर्व जाती धर्माच्या लोकांचा पक्ष आहे.गेली ७० वर्षे गोरगरीबांच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. तरी नामदार डॉ.रामदास आठवले व भावी महाराष्ट्र राज्यमंत्री विवेक कांबळे साहेब यांचे हात आणखी बळकट करुया व ह्या महिन्यामध्ये आयोजित डॉ.आठवले साहेबांचा दौरा मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करूया,असे अवाहन संजय कांबळे यांनी केले.

 

Rate Card
विवेक कांबळे म्हणाले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारे समाजकारण व राजकारण रिपब्लिकन(आठवले) पक्षाच्या माध्यमातून फळस्वरूपाला येत आहे. अनेक पंथाचे जातीधर्माचे लोक रिपब्लिकन पक्षामध्ये काम करण्यास इच्छूक आहेत.धर्मनिरपेक्ष भारत यहीं हमारा संकल्प है.डॉ.बाबासाहेबांच्या विचारांवर संकल्पित असणार्या रिपब्लिकन पक्षाला नविन पालवी फुटत आहे.नागालेंड मिझोरम सारख्या राज्यांतून आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून येत आहेत.ना.डॉ.आठवले साहेब यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक होतकरू कष्टाळू तरूण तरूणींच कल्याण झालं आहे. विविध क्षेत्रांत कुशल असणार्या गरजूंना सामाजिक न्याय विभागामार्फत योजना मिळवून दिल्या आहेत.डॉ. रामदास आठवले जूलै महिन्यात विविध विकासकामांचे उद्घाटनाकरिता जत तालुक्यात उपस्थित राहणार आहेत,हा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

 

यावेळी रिपब्लिकन(आठवले) सोशल मिडीया व आय.टी.सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, रिपाइं(आ.) चे जेष्ठ सदस्य विजय कांबळे, आय.टी.सेलचे मिरज शहर अध्यक्ष पृथ्वीराज रांजणे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे,किशोर चव्हाण,वैद्यकीय सेल आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष मोहसीन इनामदार, जत महिला तालुकाध्यक्ष माया आदाटे, जत महिला शहराध्यक्ष अश्विनी देवकाते, जत तालुका कार्याध्यक्ष विनोद कांबळे, रिपाइं (आ) जत तालुका चर्मकार आघाडी अध्यक्ष गणेश साळे, महावीर मडीमनी,सुनील गोळे, उत्तम कांबळे, सुनील कांबळे (बिळूर), जत विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजू कांबळे, जत तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे,अंबु कांबळे, बाबासाहेब कांबळे,राहुल चंदनशिवे, एकोंडी गावचे तुकाराम कांबळे,जॉन बल्हारी, कांचन कांबळे, माजी मुख्याध्यापक केशव सुर्वे,शंकर वाघमारे, आदिवासी पारधी समाज संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण, भिवर्गीचे मनोहर कांबळे,संतोष सनदी, अविनाश वाघमारे, येळदरी गावचे योजना सावंत, कुणीकुणुरचे संजय शिवाजी कांबळे, रिपाइं(आ) मातंग आघाडीचे दुर्गापा आईवळे, यांचेसह जत शहर व तालुक्यामधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.