जत,संकेत टाइम्स : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे ईडीचे सरकार आहे. ईडीचे सरकार बेरजेच्या राजकारणात मग्न आहे, हे पुन्हा एकदा नव्या प्रवेशामुळे स्पष्ट झाले आहे.राज्यात पाऊस लांबलाय शेतकरी चिंताग्रस्त झाला असून त्यांना आधार द्यायचे सोडून असताना शिंदे सरकार मात्र केवळ राजकारण करत असल्याची टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आ.सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. सध्या राज्यात सत्ता तिकडे चांगभलं असा कारभार सुरू आहे.विविध कारवायामुळे सरकार कडे जाणारी संख्या वाढत आहे.केंद्रातील मोदी सरकार ईडीचा वापर करत आहे हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.