संख ग्राम न्यायालयाचे ३० जूलैला उद्घाटन

0
संख,संकेत टाइम्स : संख येथील ग्राम न्यायालयाचे ३० जूलै रोजी उद्घाटन होणार आहे.त्यादृष्टीने ग्राम न्यायालय सुरू करण्यासाठी उपलब्ध जागेची पाहणी सांगलीचे प्रमुख सत्र न्यायाधीश पी.के.शर्मा,न्यायाधीश आर.के.मलाबदी,न्यायाधीश एस.आर भदगले,न्यायाधीश पी.पी. केस्तीकर यांनी केली.यावेळी जतचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए.के.चौगुले,प्रथम वर्ग दंडाधिकारी अमरसिंह जाधव,न्यायाधीश केस्तीकर,जत वकील संघटनचे अध्यक्ष श्री.एस.एल.खटावे,उपाध्यक्ष आर.एस.म्हमाने,सेक्रेटरी एस.एच.व्हनमाने,एन.डी.गडदे,ए.जी.रेऊर, उपसरपंच सुभाष पाटील व जत न्यायालयातील प्रमुख वकील उपस्थित होते.

 

प्राथमिक ग्राम न्यायालयासाठी लागणारी जागा,खोल्या व इतर सुविधाची न्यायाधीश महोदयांनी पाहणी केली.संख ग्रामसचिवालय येथे हे ग्रामसचिवालय होणार आहे.तेथील जागा निश्चित करण्यात आली आहे. सचिवालयाच्या सभागृहात हे ग्राम न्यायालय चालू होणार आहे.तेथे अंतर्गत सुविधा,रंगरगोटी,साउंड सिस्टम सर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना यावेळी न्यायाधीश महोदयांनी केली.डिसेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधिल गनबावडा व सांगलीतील संख येथे ग्राम न्यायालय मंजूर केले आहे.

 

या ग्राम न्यायालयांसाठी दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (न्यायाधिकारी), लघुलेखक ग्रेड 3, वरिष्ठ लिपिक,कनिष्ठ लिपिक, बेलिफ कम शिपाई अशा प्रत्येकी पाच नियमित पदांच्या निर्मितीसाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.हे ग्राम न्यायालय आठवड्यातून एक दिवस भरणार आहे.संख येथील परिसरात 32 खेडी असून तेथील ग्रामस्थांना देखील आता या ग्राम न्यायालयाचा फायदा होणार आहे.संख येथे आठवड्यातून एक दिवस (शासकीय सुट्टी वगळून) न्यायालय भरेल.संख येथील ग्राम न्यायालयाचे कामकाज दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जत या न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी कामकाज पाहतील.

 

येत्या ३० संप्टेबर रोजी उच्च न्यायालयाचे दोन प्रमुख न्यायाधीशांच्या हस्ते या ग्राम न्यायालयाचे उद्घाटन होणार आहे.यावेळी लोकमान्य कुंभार,ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार,तलाठी राजेश चाचे,ग्रामपंचायत सदस्य,व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.हे ग्राम न्यायालय सुरु झाल्यावर जत तालुक्यातील पुर्व भागातील ३२ गावातील नागरिक, पक्षकार, वकील यांच्यासाठी सोय व न्यायदान प्रक्रिया लोकाभिमुख होणार आहे.
संख येथील ग्राम न्यायालयासाठी जागेची पाहणी करताना प्रमुख सत्र न्यायाधीश पी.के.शर्मा,न्यायाधीश आर.के.मलाबदी,न्यायाधीश एस.आर भदगले,न्यायाधीश पी.पी.केस्तीकर आदी
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.