जत : जत तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ योजनेतून तातडीने पाणी सोडण्याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत,अशी माहिती भाजपाचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी दिली.
रवीपाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सदरची मागणी केली होती.बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाणी सोडण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री यांनी आदेश दिले.जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीत म्हैसाळचे पाणी आल्यास फायदा होणार आहे.