आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करा !

0

आरोग्यदायी जीवन हा आपल्या प्रभावी व्यक्तीमत्वाचा पाया आहे.माणसाचे आरोग्य शाररीक आरोग्य व मानसिक आरोग्यावर आधारलेले असून आपल्या शरीर स्वस्थासाठी मानसिक आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे.शारीरीक आरोग्यासाठी योगासने, व्यायाम, त्याचबरोबर मानसिक आरोग्यासाठी ध्यान हे खुप महत्वाचे आहे.त्यासाठी आनंदी जीवनाचा अनुभव घेण्यासाठी तणावमुक्त जीवन ,व आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.
 

आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक परीस्थितीला सामोरे जाता आले पाहिजे.नकारात्मक विचार सोडून नेहमी सकारात्मक विचार केल्यास निश्चितच तणावमुक्त जीवन जगता येते.जेवढे आपल्याला शक्य आहे तेवढे शरीरयष्टी बळकट करण्यासाठी प्रयत्न करा.कारण शरीरयष्टी बळकट असल्यास आपले मनदेखील बळकट होईल . आपल्या जीवनात ताणतणाव निर्माण होणार नाही.त्यासाठी तणाव निर्माण करणार्या विचारांना नाहीसे करा.
 

व्यायामात नेहमी सातत्य असले पाहिजे.व्यायामामुळे मानसिक तणाव कमी होतो.शारीरीक आजारही व्यायामाच्या सातत्यामुळे दुर होतात.आज माणुस प्रचंड धावपळ करत आहेत .परंतू तो आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत आहे. फास्टफुड खाण्याऐवजी हिरव्या पालेभाज्या ,फळांचा समावेश आहारात करावा.

 

 

Rate Card

आपली शरीरसंपत्ती ही सर्वात मोठी संपत्ती आहे.परंतू आज असंख्य नागरीक आरोग्याकडे पुर्णतः दुर्लक्ष करत आहेत.हि चिंताजनक बाब आहे.उत्तम आरोग्य,व तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करावी लागेल.

संतोष दत्तू शिंदे
(काष्टी),ता.श्रीगोंदा

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.