विजय ताड खूनप्रकरणातील संशयिताच्या अटकेसाठी उपोषण

0
सांगली : जत येथील नगरसवेवक व  भाजपचे युवा नेते विजय शिवाजी ताड यांच्या खूनप्रकरणी प्रमुख संशयित माजी नगरसेवक उमेश सावंत याच्या अटकेसाठी ताड कुटुंबियांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरु केले. सावंतला यांना अटक होईपर्यंत उपोषण सुरुच राहील अशी माहिती आंदोलकांनी दिली.
विजय ताड यांचे भाऊ विक्रम यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना ३ जुलैरोजी निवेदन दिले होते. सावंत याला १७ जुलैपर्यंत अटक झाली नाही, तर उपोषणाचा इशारा दिला होता. यादरम्यान, अटकेची कार्यवाही न झाल्याने त्यांनी परिवार व मित्रांसह उपोषण सुरु केले आहे.विक्रम ताड म्हणाले, सावंतच्या अटकेच्या दृष्टीने कोणतीही प्रगती झालेली नाही, त्यामुळे आमची सहनशीलता संपली आहे.

Rate Card
आंदोलनात छाया ताड, वैभव ताड यांच्यासह अक्षय शिंगारे, सौरभ खराडे, किरण शिंदे, अनिल पारसे, योगेश पाटील, शिवाजी कोडोलीकर, संतोष  भोसले, रघुनाथ भोसले, सचिन शिंदे, शरद भोसले, निलेश भोसले, सागर शितोळे आदी पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.