जत : गेल्या चार महिन्यापासून ढगाकडे डोळे लावून बसलेल्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांना बुधवारी दिलासा मिळाला.सकाळपासून सुरू असलेल्या तुरळक सरी दुपारी काही काळ वगळता रात्री उशिरापर्यत सुरू होत्या.महाराष्ट्रात बुधवारी पाऊस पडण्याचा इशारा वेधशाळेने दिला होता.सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातही बुधवारी पाऊसाची संततधार सुरू होती.शेतीसाठी अपेक्षित पाऊस नसलातरी दिवसभर थेंब थेंब कोसळत असल्याने उभ्या पिकांना जिवदान मिळणार आहे.
मोठा पाऊस झाल्याशिवाय येथील पाणी टंचाईची समस्या हटणार नसल्याचे वास्तव आहे.तालुक्यात सर्व पक्षाकडून दुष्काळ जाहिर करण्यासाठी आंदोलन सुरू आहे.पुढील काही दिवसात मोठा पाऊस न पडल्यास आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे.