![Rate Card](http://sankettimes.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-24-at-2.40.33-PM.jpeg)
महसूल प्रशासनातील बदली प्रक्रिया नियमानुरूप
सांगली : महसूल प्रशासनातील प्रशासकीय व विनंती बदल्या नियमानुरूप व पारदर्शकेतेने झाल्या असून, आजपर्यंत वर्ग ३ च्या विविध संवर्गातील १०२ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व ९ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. सदर कर्मचारी पदस्थापनेच्या ठिकाणी रूजू झाले आहेत. सदर प्रक्रिया वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन नियम व धोरणान्वये करण्यात आली आहे.
तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेल्या विनंती बदली अर्जांची छाननी करून, प्राप्त प्रस्तावांपैकी प्रशासकीय कारणास्तव मुदतपूर्व बदली करण्याबाबतचे प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्याकडून प्रशासकीय मान्यता घेऊनच बदली करण्यात आल्या आहेत. यामध्ये अव्वल कारकून ५, मंडळ अधिकारी २ आणि महसूल सहाय्यक २ यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
०००००
———- Forwarded message ———
प्रेषक: DIO SANGLI <sangmahiti02@gmail.com>
Date: मंगळ, १८, जुलै २०२३, ६:५६ PM
Subject: NEWS-20230718A
To: DIO SANGLI <sangmahiti02@gmail.com>, to: DGIPR Mantralaya <dgipr.mantralaya@gmail.com>, <dgiprnewmedia@gmail.com>, DGIPR MANTRALAYA <dgiprmantralaya.news@gmail.
मदत व बचाव कार्यासाठी एन.डी.आर.एफ.चे पथक दाखल
सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी व मदत कार्य राबविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एन.डी. आर.एफ) एक पथक सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहे. अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दिपक शिंदे यांनी दिली.
एन.डी. आर.एफ. च्या पथकामध्ये पथक प्रमुख राजेश येवले व मोहित शर्मा असे दोन अधिकारी व इतर 20 जवान आहेत. या पथकाकडे बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप, इमारत कोसळल्यानंतर शोध व सुटका कामी आवश्यक साहित्य सामग्री उपलब्ध आहे. सन 2019 सन 2021 मधील जुलै महिन्याच्या शेवटी पडणारा पाऊस व हवामान खात्याकडील अंदाज पाहता त्यानुसार राज्य शासनाकडून एन.डी.आर.एफ. पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत सांगली जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे.
या पथकामार्फत जिल्ह्यामधील संभाव्य पूर प्रवण भागातील क्षेत्र, शहरी भागातील धोकादायक इमारती, दरडग्रस्त गावाची पाहणी, धोकादायक औद्योगिक क्षेत्र इत्यादी पाहणी करण्यात येणार आहे. तसेच आपत्तीच्या काळात काय करावे व काय करू नये या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे एन.डी. आर. एक पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
महसूल प्रशासनातील बदली प्रक्रिया नियमानुरूप
सांगली : महसूल प्रशासनातील प्रशासकीय व विनंती बदल्या नियमानुरूप व पारदर्शकेतेने झाल्या असून, आजपर्यंत वर्ग ३ च्या विविध संवर्गातील १०२ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व ९ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. सदर कर्मचारी पदस्थापनेच्या ठिकाणी रूजू झाले आहेत. सदर प्रक्रिया वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन नियम व धोरणान्वये करण्यात आली आहे.