जत‌ तालुक्यात दुष्काळ जाहीर करा | डफळापूरात आंदोलन ; चारा डेपो,दुष्काळी सुविधाची मागणी

0
डफळापूर : डफळापूर ता.जत येथे दुष्काळी सुविधा मिळाव्यात म्हणून पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण व बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.रिमझिम पावसात तासभर जत-सांगली मार्ग आंदोलकांनी रोकून धरला होता.डफळापूरचे सर्कल यांना मागण्याचे निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.

 

 

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या आणि शेतीसाठी आता ग्रामस्थांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तातडीने जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.त्याचबरोबर म्हैसाळचे आवर्तन तातडीने सुरू करावे, अशीही मागणी करण्यात आली.

 

 

जूनपासून खऱ्या अर्थाने पावसाने सुरूवात होणे अपेक्षित होते,मात्र गेल्या चार महिन्यापासून पावसाने बगल दिल्याने खरीप हंगाम पुर्णत: वाया गेला आहे.म्हैसाळ योजनेचे काही प्रमाणात पाणी आल्याने ऊसासारखे पिक टिकून आहे.मात्र आता तेही पाणी अखेरीला आले आहे. मोठ्या प्रमाणात या भागात दुग्ध व्यवसाय केला जात आहे. खरीप हंगाम वाया गेला आहे.त्याचबरोबर पाऊस नसल्याने गायरानातील गवतही सुकून गेले आहे. त्यामुळे सध्या पशूधन जगविणे जिकिरचे बनले आहे.शेतात पिक नाही,जनावरांना चारा नाही त्यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत आले आहे. त्याशिवाय जत पश्चिम भागातील डफळापूर, मिरवाड,जिरग्याळ,एकूंडी,कुडणूर,शिंगणापुर सारख्या गावात सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.शासनाने आता सर्तकता दाखवून तात्काळ दुष्काळ जाहिर करून योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.

 

 

दिग्विजय चव्हाण म्हणाले,जत पश्चिम भागात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे,त्यामुळे म्हैसाळचे‌ पाणी प्रांरभी या भागात सोडावे.चारा छावण्यात सुरू कराव्यात,महावितरणकडून डिपी जळून महिना महिना बदलल्या जात नाहीत,त्या तातडीने बदलल्या जाव्यात,दुष्काळ जाहिर करून दुष्काळी योजनाचा द्यावा,अशी मागणी केली.अभिजीत चव्हाण,सुभाष गायकवाड,हणमंत कोळी,अमित शांत,विकास वाघमारे,गणेश पाटोळे आदीनी यावेळी भावना व्यक्त केल्या.

 

 

यावेळी सरपंच सुभाषराव गायकवाड,धनाजीकाका चव्हाण, देवदास पाटील,ग्रा.पं.सदस्य हर्षवर्धन चव्हाण,दिपक कांबळे,विकास वाघमारे,गणेश पाटोळे,सुभाष पाटोळे,अजित माने,सागर चव्हाण,कॉ.हणमंत कोळी,उत्तम संकपाळ,धिरज पाटील,अमित शांत,दिपक कोळी,धनाजी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
जत तालुक्यात परिस्थिती अधिकच बिकट बनल्याने आतापासूनच दुष्काळाचे काळेकुट्ट ढग दाटून आले आहेत.कारण आजअखेर तालुक्यात केवळ 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे जत तालुक्यातील गावांना कर्नाटकातून पाणी देण्याची ही मागणी जोर धरू लागली आहे. सन 2018 साली संपूर्ण मान्सूनच्या कालावधीत जत तालुक्यात अवघा 280 भागात पाऊस झाला होता. त्यावेळी जसा गंभीर दुष्काळ जत तालुक्याने अनुभवला, तसाच अनुभव पुन्हा येणार नाही ना? याची धास्ती लागली आहे. 
डफळापूर येथे आंदोलनाचे निवेदन मंडलअधिकारी यांच्याकडे देताना दिग्विजय चव्हाण,अभिजीत चव्हाण,सुभाष गायकवाड व मान्यवर
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.