अन्न परवाना काढायचा आहे,काळजी करून नका,ऑनलाइन परवाना काढण्यासाठी येथे क्लिक करा..

0

अन्न परवाना नोंदणी अर्ज मंजूर करतेवेळी त्यामध्ये बऱ्याच त्रुटी असल्याचे निर्दशनास येते, त्यामुळे त्रुटींची पूर्तता करण्याकरीता अर्ज ऑनलाईन परत पाठवावे लागतात. त्रुटींची पूर्तता करण्याकरीता अर्ज परत पाठविल्यानंतर सुध्दा पूर्तता न करता अथवा अपूर्ण पूर्तता करुन अर्ज दाखल केले जातात, अशा अर्जांची वारंवार छाननी करण्यात प्रशासनाचा बराच वेळ खर्ची होतो व परिणामी अर्ज वेळेत मंजूर करणे शक्य होत नाही. अन्न परवाना, नोंदणी साठी Foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असून अन्न व्यवसायिकांनी परवान्यासाठी अथवा नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा.

नोंदणी प्रमाणपत्र कोणी घ्यावे ?
असे अन्न व्यवसायिक ज्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ही  12 लाख रूपयांच्या आत होते  उदा. छोटे अन्न उत्पादक, हातगाडी फिरते विक्रेते, टी. स्टॉल, नाष्टा सेंटर इत्यादी.

परवाना कोणी घ्यावा ?
असे अन्न व्यवसायिक ज्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ही 12 लाख रूपयापेक्षा जास्त होते उदा. मोठे अन्न उत्पादक, हॉटेल, ढाबा, केटरर्स, घाउक/वितरक / किरकोळ विक्रेते इत्यादी.

नोंदणी, परवाना अर्ज दाखल करतेवेळी घ्यावयाची खबरदारी
कंपनीचे नाव/ व्यावसायिकांचे नाव – यामध्ये बरेच अर्जदार अर्जामध्ये केवळ कंपनीचे नाव लिहितात परंतू त्यासोबतच व्यावसायिकाचे/ भागीदारांचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.व्यवसायाचा पत्ता – यामध्ये बरेच अर्जदार केवळ गावाचे नाव, कॉलनी, रोड असा पत्ता नमूद करतात. तथापि यामध्ये संपूर्ण पत्ता म्हणजेच गट क्र./ मालमत्ता क्र./ घराचे किंवा इमारतीचे नाव, गावाचे नाव, पिनकोड नंबर नमूद करणे आवश्यक आहे.

संपर्काबाबतची माहिती/जबाबदार व्यक्ती – यामध्ये अर्जदाराने स्वतः संपूर्ण पत्ता, स्वतःचा ई मेल व भ्रमणध्वणी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. बऱ्याच अर्जामध्ये ई मेल व भ्रमणध्वनी क्रमांक हा ऑनलाईन अर्ज करणाऱ्या खाजगी / त्रयस्त व्यक्तीचा नमूद केल्याचे निर्दशनास आले आहे. अशा प्रकारे इतर व्यक्तीचा  ई-मेल व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद केलेला अर्ज फेटाळून दिला जावू शकतो.

उत्पादकांकरीता Technical Person – अन्न सुरक्षा व मानके कायद्यामधील तरतूदीनुसार प्रत्येक अन्न उत्पादक पेढ्यांमध्ये किमान एक तांत्रिक व्यक्ती असणे आवश्यक आहे. बऱ्याच अर्जांमध्ये तांत्रिक व्यक्तीचे शिक्षण हे Graduate/Qualified/BA/B.Com असे नमूद केले जाते हे चुकीचे आहे. त्यामुळे  उत्पादक पेढ्यांनी किमान एक तांत्रिक व्यक्तीची बीएससी /फुड टेक शिक्षण असलेल्याची नेमणूक करून त्याचे शिक्षण नमूद करावे.

फूड कॅटेगरी – आपण करीत असलेला /करणार असलेला व्यवसाय प्रकार व उत्पादने (Food Category) योग्य प्रकारे तपासूनच निवड करावी. परवाना अर्जामध्ये नमूद केलेल्या अन्न पदार्थाव्यतीरिक्त इतर अन्न पदार्थांची विक्री/उत्पादन करीत असल्यास सदर अन्न पदार्थाकरीता सदरचा परवाना/नोंदणी ग्राह्य धरता येणार नाही व अशा व्यवसायिकांवर विना परवाना नोंदणी बाबत कारवाई केली जावू शकते.

अन्न व्यवसायिकांना परवाना अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

संचालक/ भागीदार / मालक सहकारी संस्था सदस्य यांची फोन नंबर व स्वाक्षरी सहीत यादी सही शिक्कासहीत (या ठिकाणी स्वतंत्र यादी सादर करावी केवळ सदस्याचे ओळखपत्र अपलोड करु नये).

ओळखपत्र फोटो आधारकार्डची प्रत (सर्व  अन्न व्यवसायिक यांना आवश्यक).

Rate Card

व्यवसायाच्या जागेसंदर्भातील कागदपत्रे उदा. मालमत्ता उतारा / पत्रक, गाव नमुना 8अ, सात बारा उतारा किंवा व्यवसाय भाडे तत्वावर असेल तर भाडे करार व जागा मालकाचे मालकी हक्क कागदपत्रे इ. (सर्व परवाना अर्ज करीता आवश्यक).भागीदारी पत्रक, स्वयंघोषणापत्र किंवा Articles of Association/ Memorandum ‘of Association (भागीदारी संस्था, मालकी हक्क, सहकारी संस्था लिमिटेड संस्था इ. साठी आवश्यक).फॉर्म नं IX नॉमिनेशनसाठी, नॉमिनी व्यक्तीचा फोटो, आधारकार्डची प्रत (मालकी हक्कासाठी लागू होत नाही).

ब्लू प्रिंट ऑफ अॅप ले आउट में उत्पादन युनिटचा (Blueprint/layout plan of the processing unit showing the dimensions in metres/square metres and operation wise area allocation) (परवाना उत्पादक व्यवसायधारकांसाठी आवश्यक).

उत्पादन युनिटचे फोटोज (परवाना उत्पादक व्यवसायधारकांसाठी आवश्यक). मशिनरीची यादी सही शिक्कासहीत (परवाना उत्पादक व्यवसाय धारकांसाठी आवश्यक)पाणी तपासणी अहवाल (Chemical & Bacteriological) अधिकृत / सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांचेकडील (अन्न पदार्थात वापर होत असल्यास) Pesticide residues report of water to be used as ingredient in case of units manufacturing Packaged drinking water, packaged Miniral Water and /or carbonated water from a recognised/public health laboratory indicating the name of authorised representative of Lab  who collected the sample and date of collectiong sample, including source of raw water and treatment plan.

FSMS प्लॅन. रिकॉल प्लॅन (उत्पादक, वितरक, होलसेलर, किरकोळ विक्रेते). वाहनासाठी आरसी बुकची प्रत व वाहनचालकाचे आधारकार्ड, व फोटो (नोंदणी / परवाना अर्ज वाहतूकदारासाठी आवश्यक).  FoSTaC प्रमाणपत्र.

अन्न व्यवसायिकांना नोंदणी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचा ओळखपत्र फोटो, अर्जदाराच्या आधार कार्ड ची प्रत (अर्जदाराच्या आधार कार्ड वरील पत्ता व व्यवसायाचा पत्ता जर वेगळा असेल तर व्यवसायाच्या जागेसंदर्भातील कागदपत्रे).परवाना/ नोंदणी अर्जदारांनी / अन्न व्यवसायिकांनी अर्ज करतेवेळी फॉर्म मध्ये त्यांचा वैयक्तिक मोबाईल नंबर व ईमेल नमूद करावा. तसेच ज्या अन्न व्यवसायिकांना परवाना / नोंदणी मंजूर झालेले आहेत परंतु त्यामध्ये अन्न व्यवसायिकांनी त्यांचा वैयक्तिक मोबाईल नंबर व ईमल नमुद केलेले नसेल, तर त्यांनी तात्काळ ऑनलाईन प्रणाली मध्ये वैयक्तिक माहिती अद्ययावत करण्याकरीता परवाना अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा, जेणेकरून अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरणाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचना संबंधित अन्न व्यवसायिकांपर्यंत पोहोचतील.

अन्न व्यवसायिकांच्या अन्न आस्थापनांची तपासणी ही ऑनलाईन होत असल्यामुळे सबंधित तपासणीच्या अनुषंगे अन्न व्यवसायिकास सुधारणा नोटीस ही ऑनलाईन पाठविली जाते तसेच तपासणीच्या अनुषंगे कोणतीही कारवाई ही ऑनलाईन पध्दतीनेच करण्यात येत असल्यामुळे सबंधित अन्न व्यवसायिकांनी त्याचा वैयक्तिक मोबाइल नंबर व ईमेल नमुद करणे आवश्यक आहे.सर्व उत्पादक, रिपॅकर, रिलेवर्ल्स, दुग्धजन्य पदार्थ उत्पादक आस्थापना यांनी ऑनलाईन Fascos.fssai.gov.in या संकेतस्थळावर वार्षिक परतावा भरून अपलोड करणे बंधनकारक आहे. वार्षिक परतावा भरण्याची मुदत ही प्रत्येक वर्षाच्या दि. 31 मे पर्यंत आहे. या मुदतीनंतर प्रत्येक दिवसाला 100 रूपये प्रमाणे विलंब शुल्क आकारला जातो. सर्व अन्न व्यवसायिकांनी परवाना नोंदणी करीता अर्ज करतेवेळी त्या अनुषंगीक नियमावलींची माहिती घेवून व सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत दाखल करुनच अर्ज करावा.

संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.