विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत | – डॉ. बी.एम. हिर्डेकर,घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

0
जयसिंगपूर : पदवी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारची नोकरी आणि पद आपल्याला मिळवायचे आहे हे निश्चित केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी नेहमी मोठी स्वप्ने पहावीत ते साकार करण्यासाठी अपार कष्ट करणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन डॉ.बी एम हिर्डेकर यांनी संजय घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष पदवी व पदव्युत्तर शाखांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभावेळी केले.यावेळी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.शैक्षणिक विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.व्ही.व्ही. कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी घोडावत विद्यापीठातील अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ.हिर्डेकर पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. यासाठी पदवी शिक्षण घेत असताना कौशल्यपूर्ण शिक्षण आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. तुमचे कौशल्य मिळवण्यातील सातत्य तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल याची खात्री बाळगा.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थ्यांना संजय घोडावत यांचे विद्यापीठाचे स्वप्न, कार्य-कर्तृत्व विद्यार्थ्यांना सांगितले. त्याचबरोबर स्वतःच्या विद्यार्थी दशेतील प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचे कार्य घोडावत विद्यापीठाकडून होत आहे याबद्दल पालकांनी निश्चिंत राहण्यास आश्वस्थ केले.यावेळी परीक्षा नियंत्रक डॉ.एन.के पाटील, रिसर्च डीन डॉ.ए.डी. सावंत सर्व डीन,प्राध्यापक,कर्मचारी,विद्यार्थी,पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे यांनी सर्वांचे आभार मानले तर प्रा. जयप्रकाश पाटील आणि प्रा.दीपिका पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.