जन्मदात्याच्या डोक्यात दांडके घालून मुलांने केला खून

0

कडेगाव तालुक्यातील पोटच्या पोराने बापाचा डोक्यात लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन हा खून केल्याची घटना घडली आहे. मयत वडीलाचे विहापुर येथील घर व शेतजमीन नावावर करीत नसल्याच्या कारणावरून हा खून केल्याचे समोर आले आहे. तानाजी यशवंत माने (वय ७०, रा. विहापूर) असे मयताचे नाव आहे. तर याप्रकरणी संशयित आरोपी प्रदीप तानाजी माने याच्या विरोधात कडेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मयत तानाजी माने यांच्या पत्नी मंगल तानाजी माने ( वय 50 )यांनी फिर्याद दिली आहे.

Rate Card

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तानाजी माने यांचा मुलगा संशयित आरोपी प्रदीप माने याला व्यसनी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो घर आणि जमीन नावावर करा म्हणून आपल्या वडीलाशी वाद घालत होता. दरम्यान शनिवार (दि २९) रोजी दुपारी संशयीत प्रदीप हा दारू पिऊन आपल्या घरी आला. वडील तानाजी माने यांच्यासोबत घर आणि शेतजमीन नावावर करण्याच्या कारणावरून वाद घालू लागला.रागाच्या भरात त्याने वडील तानाजी यांना लाकडी दांडक्याने डोक्यात, खांद्यावर जबर मारहाण केली.यामध्ये तानाजी हे गंभीर जखमी झाले. सांगली सिव्हील हॉस्पिटल मध्ये तानाजी यांना उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा रविवार (दि 30) रोजी मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.