जत,संकेत टाइम्स : येळवी(ता.जत) येथील गरजू लोकांना अन्नदा संस्था मुंबई,मिरज येथील रूग्ण सेवा प्रकल्प व ओंकार स्वरुपाच्या माध्यमातून प्रोटिनयुक्त पोषण आहार किटचे वाटपाचे आयोजन करण्यात आले.
करोना महामारीच्या मुळे अनेक अडचणी शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही दिसून येत आहेत. अनेकांना रोजगारापासून वंचित होण्याची वेळ आली आहे. करोनामुळे सर्वच ठिकाणी अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत, कष्टकरी लोक उपजिवीकेसाठी कोरोना लाॅकडावूनच्या काळामध्ये त्यांचे रोजगारावर निर्बंध आल्यामुळे त्यांच्यासमोर गुजराण करण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
अन्नदा संस्था मुंबई व रुग्ण सेवा प्रकल्प मिरजचे डाॅ.भालचंद्र साठे सरांनी ओंकार स्वरुपाच्या कामावर वर विश्वास दाखवला.येळवी चे उपसरपंच सुनील अंकलगी, संस्थेचे अध्यक्ष दिपक अंकलगी, सचिव तथा ग्रा.पं.सदस्य संतोष पाटील,सुरेश जगताप,प्रविण तोडकर, कृष्णदेव खंडागळे, प्रकाश शिंदे, निलाप्पा स्वामी, शांतीनाथ मालगत्ते,बजरंग चव्हाण ,दिलीप आवटे, अनंत सुतार आदि ग्रामस्थ उपस्थितीत होते.
येळवी ता.जत येथे ओंकार स्वरुपा फौंडेशनकडून अन्नदा पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.