जत : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे,या निर्णयाचे जत तालुका काँग्रेस कमिटीकडून पेढे भरवून स्वागत केले.
भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही, मनमानी व सुडबुद्धीच्या राजकारणातून राहुल गांधी यांना शिक्षा झाली होती.खोट्या तक्रारीच्या माध्यमातून भाजपाने हे षडयंत्र रचले होते. पण देशात अजून न्याय व्यवस्था जागृत आहे, या न्यायव्यवस्थेनेच भाजपा व मोदी सरकारचे मनसुबे उधळून लावले आहेत.सुप्रीम कोर्टाने शिक्षेला दिलेली स्थगिती हा सत्याचा विजय आहे.या निकालाचे स्वागत जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने फटाके फोडून, मिठाई वाटून जल्लोष करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम,भूपेंद्र कांबळे,तुकाराम माळी,राजू यादव,सलीम पाच्छापुरे, अशोक बंनेनवर,मोहन मानेपाटील,दिनेश जाधव,विकास माने, राहुल काळे,पोपटराव शिंदे,शिवकुमार तंगडी,महादेव कोळी,मिथुन माने,बाळ तंगडी,अण्णां अंगडी, विशाल कांबळे, मानतेश मांगलेकर, संजय शेटे, वसंत जाधव, शरद जाधव, गणेश सावंत व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.