कोळी समाजाने एकजूटीने लढा उभारण्याची गरज
डफळापूर : खलाटी(ता.जत) येथे विधानपरिषद आमदार रमेश पाटील यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून 7 लाख रुपये मंजूर झालेल्या महादेव कोळी समाज मंदिराच्या वास्तूचे उद्घाटन कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष चेतन पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.चेतन पाटील यांनी लखाबाई देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.राज्यभर विखुरलेल्या कोळी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व शासन दरबारी लढा देण्यासाठी या समाजाने संघटित व्हावे असे आव्हान चेतन पाटील यांनी केले.
गेल्या अनेक वर्षांपासून कोळी समाज अनेक समस्यांशी झगडत आहे समाजातील जबाबदार व्यक्तीने संघर्ष न करता एकजुटीने काम केल्यास याचा निश्चितच फायदा होईल असेही पाटील म्हणाले. अनेक समाज बांधवांनी निवेदनातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू,असे आश्वासही पाटील यांनी दिले.कोळी महासंघाचे सांगलीतुन कुमार कोळी, राकेश कोळी कवठेमहाकाळचे संजय कोळी, पलूसचे एकनाथ सूर्यवंशी,जतचे बाळासाहेब कोळी, शशिकांत कोळी, अनिल कोळी सुभाष कोळी, माजी नगरसेवक महादेव कोळी मनसेचे अध्यक्ष कृष्णा कोळी, राजेंद्र नाटेकर,बाजचे कल्लाप्पा कोळी,
असंगीचे गोपाळ कोळी, निगडीचे संजय कोळी, रणजीत कोळी,तात्या कोळी, सोमनिंग कोळी, महिला आघाडीच्या विमलताई कोळी व नयना सोनवणे, खलाटीतील युवा अध्यक्ष नरेंद्र कोळी, महर्षी वाल्मिकी सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप कोळी, राजु कोळी, नवनाथ कोळी, माजी उपसरपंच सदाशिव कोळी, बाजी कोळी,विठ्ठल तात्या कोळी, लक्ष्मण कोळी, सचिन कोळी, सतिश कोळी, शहाजी कोळी इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.