मनोहर भोसले यांना पितृशोक

0
डफळापूर : येथील कॉग्रेस नेते तथा सोसायटीचे माजी चेअरमन मनोहर भोसले यांचे वडील विश्वासराव तुकाराम भोसले (वय ९५) यांचे वृधापकाळाने शुक्रवारी निधन झाले.विश्वासराव भोसले हे सर्व सोसायटीचे चेअरमन होते.चाळीस वर्षापुर्वी त्यांनी राजकारणात समाजकारणाचा ठसा उमटविला होता.

 

 

प्रेमळ स्वभाव,सर्वांशी मिळून मिसळून राहणे ही विश्वासराव भोसले यांची ओळख होती.मनोहर भोसले यांच्या राजकीय जीवनात त्यांचे मोठे योगदान होते.
गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते.शुक्रवारी त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन आज रविवार ता.७.३० वाजता होणार आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.