शेगाव : म्हैसाळ योजनेच्या पाण्याने शेगाव तलाव भरलेनंतर त्याचे पूजन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी करत शेगाव येथील ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराचा स्वीकार करीत सर्वांशी संवाद साधला. तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे आणि इथला प्रत्येक भाग सुजलाम-सुफलाम झाला पाहिजे यासाठी घेतलेल्या कष्टाचं चीझ होतंय याचा आनंद आहे.
तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी मिळालं पाहिजे हीच प्राथमिकता ठेवून पुढे जातोय.पाणी शिवारात दाखल झाल्यावर इथल्या शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद हीच आपल्या कामाची पोहोच पावती आहे,असे यावेळी आ.सावंत म्हणाले.