चीनच्या ट्रॅकवर धावणार जतची सुकन्या राणी मुचंडी | जागतिक विद्यापीठ मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड 

0
जत: जत तालुक्याच्या वैभवशाली क्रीडा परंपरेत आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे. जत तालुक्याची सुकन्या राणी सदाशिव मुचंडी चीन येथील चेंगडूच्या ट्रॅकवर धावणार आहे. तिची जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक एच एम मुजावर यांनी ही माहिती दिली.

 

जत तालुक्याला क्रीडा क्षेत्राची वैभवशाली परंपरा आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तालुक्यात निर्माण झाले आहेत.  कन्या हायस्कूल व श्री दत्त माध्यमिक विद्यालयाने क्रीडा क्षेत्रातील आपला धबधबा कायम ठेवला आहे.

 

सुवर्णकन्या स्वाती व्हनवडे यांच्यानंतर आता राणी मुचंडी या गुणी खेळाडूंने जतच्या वैभवात भर घातली आहे.जत येथील कन्या हायस्कूल व श्री दत्त उच्च माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थी व राष्ट्रीय खेळाडू राणी सदाशिव मुचंडी हिची जागतिक आंतरविद्यापीठ  क्रीडा स्पर्धेसाठी चीन (चेंगडू) येथे 28 जुलैपासून स्पर्धेला सुरुवात झाली आहे.नुकत्याच कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी, भुवनेश्वर ओडीसा येथे झालेल्या,अखिल भारतीय युनिव्हर्सिटी स्पर्धेत, हाफ मॅरेथॉन (21 किलोमीटर) स्पर्धेत 1 तास 21 मिनिटे ही वेळ तिने नोंदवली.
   
राणी मुचंडी जतच्या कन्या हायस्कूल व श्री दत्त उच्च माध्यमिक विद्यालयात 2014 ते 2018 पर्यंत, राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक हाजीसाहेब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सराव करत होती.त्याचवेळी मध्य प्रदेश (भिलाई) येथे 15 जानेवारी 2018 रोजी झालेल्या राष्ट्रीय असोसिएशन क्रॉसकंट्री स्पर्धेत सहभाग नोंदवला होता व 2 जानेवारी 2018 पुणे (बालेवाडी) येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय क्रॉस कंट्री स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवला होता.
2018 नंतर भारतीय खेल‌ प्राधिकरण चे प्रशिक्षक सिंग यांच्याकडे सातत्याने धावण्याचा सराव करीत होती. 2014 ते आजतागायत अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धा जिद्द व चिकाटीच्या जोरावर, सातत्याने प्रयत्न करत गाजविल्या व गोल्ड, सिल्वर व ब्रांझ पदके मिळवली.
सध्या ती शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोरेगाव येथील डी पी भोसले महाविद्यालयात एम ए प्रथम वर्षात शिकत आहे. राणी अभ्यासात पण खूप हुशार आहे. तिला बारावीच्या बोर्ड परीक्षे मध्ये 80 टक्के मार्क मिळालेले आहेत. राणी खूप शांत व  संयमी आहे.तिच्या आंतरराष्ट्रीय निवडीबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक अण्णासाहेब लोखंडे, क्रीडा प्रशिक्षक एच एम मुजावर यांनी अभिनंदन केले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.