सांगलीत बसचालकास मारहाण,चौघांवर गुन्हा दाखल

0
सांगली : एसटीने चारचाकीस पाठीमागून धडक दिल्यानंतर चौघांनी एसटीचालकास लाथाबुक्कयांनी मारहाण करुन त्याला शिवीगाळ केली. यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

 

 

याप्रकरणी अतुल सहदेव गोंधळे (रा. गावभाग, सिध्दार्थ परिसर, सांगली ) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती अशी, फिर्यादी अतुल गोंधळे हे कोल्हापूर – मिरज ही एसटी घेवून दि. ६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अंकली ते मिरज रस्त्यावरील विठ्ठल पाटील टेक्निकल कॉलेज समोरील इनामधामणी फाट्यावरील चौकात अपघात घडला होता. एसटीने त्याच्या समोर असलेल्या चारचाकीस धडक दिली.

 

 

त्यामुळे चारचाकी चालक संशयीत नदीम गोलंदाज आणि अन्य अनोळखी तिघा जणांनी बसचालकाशी वादावादी घातली. तसेच चालकाच्या केबीनमध्ये जावून त्याच्या खुर्चीवर बसून चालकास शिवीगाळ केली. तसेच त्यास लाथाबुक्कयांनी मारहाण केली. यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी चालक अतुल गोंधळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अद्यापपर्यत कोणासही अटक करण्यात आलेली नव्हती.
Rate Card
शेतकऱ्याची साडे सहा लाखाची फसवणूक
सांगली : उसतोडीसाठी कामगार पुरविण्याचे आमिष दाखवून मिरज तालुक्यातील दुधगाव येथील एका शेतकऱ्याची तब्बल ६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याबाबत दादासाहेब आदिनाथ शिरगावे (रा. सरकारी दवाखान्यानजीक, दुधगाव ) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.