चक्क मुलींनेच‌ दिली बापाला ‌मारायची सुपारी

0

सोलापूर: प्रेमात अथाग बुडालेल्या मुलीने प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या जन्मदात्या बापाचे हातपाय तोडण्याची सुपारी आपला प्रियकर आणि त्याच्या साथीदारांना दिली.त्यानुसार वडिलांवर प्राणघातक हल्ला झाला असता मुलीने रचलेला बनाव माढा पोलिसांनी अवघ्या काही तासांतच उघडा पाडत तिच्या प्रियकरासह पाच हल्लेखोरांना अटक केली आहे.या धक्कादायक प्रकाराने ‌खळबळ उडाली असून,वडिलांची प्रकृत्ती अद्याप चिंताजनक आहे.

 

आयुष्यभर अहिंसा परमो धर्म तत्वाचे पालन करणाऱ्या माढा येथील एका प्रसिध्द व्यापाऱ्यावर असा प्राणघातक हल्ला चक्क पोटच्या एमबीए शिक्षण पुर्ण केलेल्या उच्चशिक्षित मुलीकडून झाल्याने कुणावर विश्वास ठेवायचा असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

 

Rate Card

याप्रकरणी संबंधित मुलीसह तिचा प्रियकर चैतन्य कांबळे तसेच आतिश लंकेश्वर, रामा पवार, आनंद ऊर्फ बंडू जाधव, मयूर चंदनशिवे अशा पाचजणांना अटक करण्यात आली असून सर्वांना पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या बापावर सोलापुरातील एका खासगी रूग्णालयात उपचार होत आहेत.मुलीच्या अशा कृत्यांने त्यांचे कुंटुबियही हादरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.