सांगलीच्या तीन महत्वाच्या बातम्या, वाचा सविस्तर

0
सांगलीत एसटीच्या धडकेत वृध्द जखमी
सांगली :  एसटीने दुचाकीला धडक दिल्याने विलास बाळू राजमाने (वय ७४, रा. पत्रकारनगर, मिथीलानगरी ) हे जखमी झाले. हा अपघात दि. ८ रोजी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पत्रकारनगर परिसरातील शिंत्रे रुग्णालयासमोर झाला.फिर्यादी विलास राजमाने हे वालनेवाडीहून पत्रकारनगरकडे दुचाकीवरुन (क्र. एमएच १० बीएच ८११३) येत होते. ते शिंत्रे रुग्णालयासमोर आले असता त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एसटीने (क्र. एमएच ०९ ईएम ३६५२) त्यांना ओलांडून पुढे जाताना धडक दिली. यामध्ये ते दुचाकीवरुन खाली पडल्याने त्यांना दुखापत झाली. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात एसटी वाहनचालक शहाजी दादासो पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीत भरदिवसा एक लाखाची रोकड लंपास
सांगली : बॅकेतून काढलेली रोकड पिशवीत ठेवून ते घरी घेवून जाताना पाळतीवर असलेल्या दोन महिलांनी त्यातील एक लाख रुपये लंपास करुन पोबारा केला. ही घटना दि. ९ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शहरातील सीटी पोस्टनजीक असलेल्या बॅँक ऑफ महाराष्ट्रच्या दरवाजात घडली.याप्रकरणी रघुनाथ दादू कदम (रा. राणाप्रताप चौक, सांगलीवाडी ) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती अशी, फिर्यादी रघुनाथ कदम हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. दि. ९ रोजी ते बॅँक ऑफ महाराष्ट्र शाखेत गेले होते. तेथून त्यांनी खात्यातून एक लाखाची रक्कम काढली. ती पिशवीत ठेवून त्यांनी पिशवी खांद्याला अडकवली. बॅँकेतील अरुंद गेटमधून बाहेर पडताना त्यांच्या पाठीमागे आणि पुढे दोन महिला आल्या. काही समजायच्या आता मागे असलेल्या महिलेने पिशवीला ब्लेड मारुन त्यातील एक लाखाची रक्कम लंपास केली आणि तेथून पलायन केले. ही बाब काही वेळाने फिर्यादी रघुनाथ कदम यांच्या लक्षात आली. पोलिसांनी दोघा चोरट्या महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बुधगावनजिक दुचाकीच्या धडकेत एक ठार
सांगली : भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने डोक्यास मार लागल्याने दुसऱ्या दुचाकीवरील एकजण ठार झाला. हा अपघात दि. ५ रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास कुमठे फाटा ते बुधगाव रस्त्यावरील बुधगाव महाविद्यालयासमोर घडला. मोहन  रामचंद्र कदम (वय ३६, रा. कर्नाळ, ता. मिरज ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.याबाबत राहुल लक्ष्मण कदम (रा. कर्नाळ, ता. मिरज ) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती अशी, फिर्यादी यांचा चुलत भाऊ मोहन कदम हा बुधगावहून कर्नाळकडे दुचाकीवरुन (क्र. एचएच १० बीडी ५२९९) चालला होता. तो बुधगाव महाविद्यालयानजीक आला असता पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने (क्र. एमएच १० डीसी १००४) त्याला धडक दिली. यामुळे मोहन हा रस्त्यावर फेकला गेला. त्याच्या डोक्यास मार लागला. उपस्थितांनी त्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र  गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरुन पसार झाला आहे. त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीतून दोन दुचाकी चोरीला
सांगली : शहरातील दोन ठिकाणाहून दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या. फिर्यादी भाऊसो रामचंद्र कांबळे (रा. धरणगुत्ती, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी त्यांची दुचाकी दि. ७ रोजी भारती रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये लावली होती.चोरट्याने सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दुचाकीचे (क्र.एमएच १० के २५०५) कुलूप तोडून ती लंपास केली. तर सुदेश सुनील भोसले (रा.दत्त चौक, सांगलीवाडी) यांनी त्यांची दुचाकी दि. ७ रोजी विजयनगर येथील स्वदेशी हाईटस् अपार्टमेंटनजीक लावली होती. दुपारच्या सुमारास चोरट्याने सदर दुचाकी (क्र. एमएच ०९ सीझेड ९९४९) लंपास केली. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.