कृषी विभागाची मोठी कारवाई,21 लाखांचा मुद्देमाल जप्त | संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल

0
2



सांगली,संकेत टाइम्स : खरीप हंगाम सन २०२१ मध्ये शेतक – यांना खते रास्त दरात व गुणवत्ता पूर्ण उपलब्ध करुन देण्याकरिता तसेच विक्रेत्यांनी या निविष्ठांची शेतक – याना जादा दराने खते विक्री करू नये , खतांचा काळाबाजार करू नये तथा भेसळ युक्त खते शेतक – यांना विक्री होऊ नये या सांगली जिल्ह्यात कृषी विभागाने 11 भरारी पथके नियुक्त करण्यात  आलेली आहेत . आज दि 12 रोजी सांगली शहरा मध्ये ग्लोबल इम्पोर्टस पत्ता शॉप न २. गजाजन कॉलोनी , द ओरीअन अपार्टमेंट जुना कुपवाड रोड सह्याद्री नगर सांगली येथे ग्लोबल इम्पोर्टस चे मालक तोसिफ नसीर मार्फानी रा . सांगली  हे शेतक – यांना व किरकोळ उत्पादकांना तसेच काही कृषी सेवा केंद्राना अनाधिकृतपणे सूक्ष्म अन्नद्रव्ये विकतात याची गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळालेवरून आज दि . १२/०६/२०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता वरील नमूद पत्यावर जिल्ह्यास्तरीय भरारी पथकाने  ग्लोबल इम्पोर्टसच्या कार्यालयात माग्नेशीअम सल्फेट , फेरस सल्फेट , सल्फर , बोरॉन , झिंक सल्फेट , कॅल्शीयम नायट्रेट या सूक्ष्मअन्नद्रव्यांची / खतांची नमुने भरारी पथकास आढळून आली . ग्लोबल इम्पोर्टसच्या कार्यालयाच्या शेजारील गाळा नं . २ मध्ये कॅल्शीयम नायट्रेट २ मे.टन ( ८० पिशव्या X २५ कि.ग्रा . प्रति पिशवी ) , सल्फर ९९.९ % २ मे . टन ( ८० पिशव्या X २५ कि.ग्रा . प्रति पिशवी ) , सल्फर ९ ० % ( ९ ०० कि.ग्रा . ) , झिंक सल्फेट ( ४०० कि.ग्रा . ) . ( १६ पिशव्या x २५ कि.ग्रा . प्रति पिशवी ) , फेरस सल्फेट , २ मे.टन. ) , ( ४० पिशव्या X ५० कि.ग्रा . प्रति पिशवी ) , माग्नेशीअम सल्फेट ५० कि.ग्रा . एक पिशवी , बोरॉन , २ मे . टन ( ८० पिशव्या X २५ कि.ग्रा . प्रति पिशवी ) तसेच सिलिकॉन गोळी ५ मे.टन , सिलिकॉन पावडर १० मे.टन , हुमिक फ्लेक्स ३० मे . टन बेन्टोनेट गोळी ३० मे . टन असा एकूण तब्बल ८४मे . टन ३५० किलो इतका साठा ग्लोबल इम्पोर्टसच्या शेजारील गाळा नं . २ , तसेच समोरील हमीद इमारतीच्या तळघरात व तिरुमला पार्क गाळा नं . ५ पत्ता लवली सर्कल रोट सांगली येथे आढळून आला . सदरच्या मुद्देमाला पैकी सुक्ष्मअन्नदव्ये । यते अंदाजे किमत रु , ४,१०,६०० / – व इतर अनुषंगिक मुद्देमाल अंदाजे किमंत रु . १६.५०,००० / अशी एकूण अंदाजे रक्कम रु . २०,६०,६०० / – ( रु . विस लाख साठ हजार सहाशे मात्र ) आहे . ग्लोबल इम्पोर्टसचे मालक तोसिफ नसीर मार्फानी रा . सांगली यांच्या कडे भरारी पथकाने विक्री परवाना व खरेदी पावत्या मागणी केली असता त्यांनी सादर नाही नाही सविस्तर चौकशी अंती कोणत्याही प्रकारचा परवाना स्वीकृत करुन न घेतल्या बाबत त्यांनी स्वतः दिलेल्या कबुली नुसार वरील सुक्ष्मअन्नद्व्यापैकी फेरस सल्फेट , सल्फर , बोरॉन , झिंक सल्फेट , कॅल्शीयम नायट्रेट वा सुक्ष्मअन्नद्रव्याचे / खतांचे संशयित नमुने सर्व पंचा समक्ष व स्वत : मालक यांचे समोर घेऊन ते सिलबंद करून संबंधित विनापरवाना खताचे नमुने  शासकीय खत तपासणी प्रयोगशाळा  येथे तपासणी करिता सादर करण्यात आला आहे. भारतीय संहित १८६० कलम ४२० ब खत नियत्रंण आदेश १९८५ सुधारणा २०१८ व २०१ ९ मधील खंड ७ फॉर्म B मधील अट व शर्त क्र . ४ , खत नियंत्रण आदेश खंड २५ ( ३ ) नुसार , खंड ८.खंड ३ , बंड १२ , खंड ११ , खंड २१ , खंड ३५ ( १ ) ( a ) व जीवनावश्यक वस्तू अधिनियम १ ९ ५५ मधील ३ ( २ ) ( D ) व जीवनावश्यक वस्तू अधिनियम १ ९ ५५ मधील ७ ( १ ) ( A ) ( २ ) अन्वये संबंधितावर संजय नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर प्रकरणी जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक श्री सुरेंद्र पाटील यांनी यासंबंधी तक्रार दिली, सदर भरारी पथकामध्ये जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री सुरेंद्र पाटील मोहिम अधिकारी  श्री धनाजी पाटील यांच्यासह इतर कर्मचारी यांनी  कारवाई केली सदर कारवाई जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बसवराज मास्तोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली त्याबाबतचा गुन्हा संजय नगर पोलीस ठाणे येथे दाखल झाला असून याप्रकरणी पुढील तपास  पोलीस उप निरीक्षक महेश डोंगरे करत आहेत

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here