..अखेर म्हैसाळ विस्तारित योजनेचे कामास पालकमंञ्यांकडून कार्यारंभ आदेश

0
2
1028 कोटींच्या कामे सुरू करण्याचे आदेश
सांगली : विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित, मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी, तसेच जिल्ह्याचा सर्वंकष विकास व्हावा, यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन आराखड्यातून विकासकामांसाठी 405 कोटींची तरतूद केली असून या माध्यमातून जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली.
भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर दिलेल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी ही ग्वाही दिली.भारतीय स्वातंत्र्याच्या उपस्थितांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले,जिल्ह्याच्या पूर्व भागातील विशेषत: जत तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी देण्यासाठी 1930 कोटी पैकी 1028 कोटी रूपयांच्या म्हैसाळ विस्तारीत योजनेच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला असून लवकरच हे काम सुरू होत आहे. यामुळे जत तालुक्यातील 65 गावांचा सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल.मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेसाठी जिल्ह्यात 28 ठिकाणी 749 एकर जागा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीस उपलब्ध करून दिली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून 436 प्रस्तावांना कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. द्राक्षे, डाळिंब व भाजीपाला पिकांच्या निर्यातीसाठी जिल्ह्यातून 12 हजाराहून अधिक लाभार्थींची नोंदणी झाली आहे. तर 17 हजार मेट्रीक टन द्राक्ष पिकाची निर्यात झाली आहे.

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतून पावणेपाच हजार लाभार्थींना 13 कोटीहून अधिक अनुदान वितरीत केले आहे.प्राधान्य कुटुंब योजनेतून जवळपास पावणे सतरा लाख लाभार्थींना तर अंत्योदय योजनेतून जवळपास 31 हजार कुटुंबांना लाभ देण्यात येत आहे. तसेच,जिल्ह्यात 57 शिवभोजन केंद्रांवरून आतापर्यंत जवळपास 56 लाख 33 हजार शिवभोजन थाळ्यांचे सवलतीच्या दरात वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून यापूर्वी केशरी व पिवळ्या कार्डधारकांना दीड लाख रूपयांची मदत केली जात होती. आता सर्वच नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कवच प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील39  रुग्णालयात ही योजना राबवण्यात येत आहे.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून आत्तापर्यंत 1375 बालकांवर अत्यंत गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया तर 14,720 बालकांच्या इतर शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत.

 

बिट मार्शल पोलीस अंमलदारांना 41 दुचाकी व संपर्कासाठी मोबाईल फोन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.जिल्ह्यात एकूण दोन लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षात जवळपास 44  हजार बांधकाम  कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यांना शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक व सामाजिक लाभाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये 43 हजारहून अधिक कामगारांना जवळपास 66 कोटी रूपयांचा शिक्षण विषयक योजनांचा लाभ, 163 कामगारांना जवळपास 32 लाख रूपयांचा आरोग्यविषयक योजनांचा लाभ, 332 कामगारांना जवळपास पावणे 2 कोटी रूपयांचा विविध आर्थिक योजनांचा लाभ, 82 कामगारांना 41 लाख 82 हजार रूपयांचा विविध सामाजिक योजनांचा लाभ देण्यात आला आहे.

 

सन्मान धन योजना 2022 अंतर्गत 55 वर्ष पूर्ण केलेल्या 66 घरेलु महिला कामगारांना प्रत्येकी 10 हजार रूपये सानुग्रह अनुदान याप्रमाणे साडेसहा लाख रूपये इतका लाभ वितरीत करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या ई-श्रम कामगार नोंदणी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत जवळपास  साडेतीन हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. तर 3 हजार कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 1 व 2 मधील सर्व कामे पूर्ण आहेत. टप्पा 3 मधील 14 कामांसाठी 69 कोटीहून अधिक रकमेस मंजुरी मिळाली आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 1 मधील 256  पैकी  244 कामे पूर्ण झाली आहेत. टप्पा 2 मधील 58 कामांसाठी 210 कोटी 22 लाख रूपये रकमेस मान्यता प्राप्त आहे. ही सर्व कामे निविदा प्रक्रियेत असून येणाऱ्या काळात सर्व गावांना दर्जेदार रस्ते मिळतील.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here