फुलासारखे आनंदी रहावे !

0
3
आपल्या जीवनात फुलांचे महत्व अधोरेखित आहे.आयुष्यात आनंदी कसे रहायचे ते आपण फुलांकडून शिकले पाहिजे.आपण बागेत आजुबाजुला फुले पाहतो.खरं तर फुलांचे आयुष्य  जेमतेम २४ तास सुर्यौदय ते सुर्यास्त झाला की फुले आपोआप गळून पडतात . कोमेजुन जातात.इतकं कमी आयुष्य मिळून देखील ते टवटवीत राहते.निसर्गाची किमयाच न्यारी म्हणावी लागेल.कितीतरी भुंगे,मधमाशा ,पक्षी ,फुलपाखरे  फुलांचा आनंद घेतात.आपण देखील फुलझाडे पाहुन आनंदी,समाधानी होतो.फुलांच्या सुवासाने मन आल्हाददायक होते.

 

फुलझाडेसुद्धा हाच  संदेश देत असतात .की छोट्याशा आयुष्यात देखील आपण  इतरांना आनंद दिला पाहिजे.स्वता : झिजून दुसर्यांना आनंद द्यायचा .आपल्या कोमजण्याची काळजी करायची नाही उद्याची चिंता करत बसण्यापेक्षा आजच्या दिवसाचा आनंद कसा घेता येईल हे पाहिले पाहिजे.आपण मनुष्याने देखील हा बोध घेतला पाहिजे निरर्थक चिंता करण्यापेक्षा आज आहे तो वेळ मिळाला तो आपण सत्करणी लावला पाहिजे.आहे त्यात आनंद घेतला पाहिजे.आपणदेखील प्रेमाने जगायला शिकले पाहिजे.
उगीच दुःख  उगाळत बसण्यापेक्षा आपण आहे .त्यात समाधान मानावे.मी पणाचा अहंकार न बाळगता इतरांच्या जीवनात आनंद फुलवता आला पाहिजे.फांद्या सुकतात ,पाने गळतात. तरीपण फुल त्याचा फुलायचा गुणधर्म सोडत नाही.तसंच माणसाने देखील आपल्याला कोणी साथ देवो अगर न देवो.आपण आनंदी राहीले पाहिजे.
प्रत्येक फुल हे सुदंर दिसते पण ते कधीच कोणाशी स्पर्धा करत नाही .सुर्य उगवला की फुलणे एवढेच त्यांना माहीत असते.आपणदेखील फुलासारखे फुलत राहीले पाहिजे.प्रसन राहीले पाहिजे.फुलांना हे जमते तर आपल्याला का नाही जमणार आयुष्यात आनंदी कसे रहायचे ते फुलांकडून आपण शिकावं ज्या मातीत ती फुले फुलतात त्या मातीलाही सुगंध देतात.आपणही समाजाचे देणे लागतो.आयुष्यात आपण हे शिकले पाहिजे.फुलासारखे आनंदी राहीले पाहिजे.
संतोष दत्तू शिंदे
मु.पो.काष्टी ,ता.श्रीगोंदा, जिल्हा, अहमदनगर
महाराष्ट्र
मो.७७२१०४५८४५
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here