राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सत्तेत जाताच राष्ट्रवादी कॉग्रेसचे तुरुंगात असलेले नेत्यांना जामिन मिळत असून आताही राष्ट्रवादीचा आणखीन एक बडे नेते असलेले माजी आमदार यांना जामिन मिळाला आहे.नुकतेच दीड वर्ष ईडीच्या कारवाईत तुरुंगात असलेले माजी मंत्री, आमदार नवाब मलिक यांची वैद्यकीय कारणास्तव जामिनावर सुटका झाली होती.आता अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कोट्यवधी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी आमदार रमेश कदम हे जामिनावर बाहेर आले आहेत.अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज स्वरूपात पैसे वाटले आहे. त्यामुळे त्याला करप्शन म्हणता येणार नाही. या प्रकरणात झालेल्या आरोपाची तपासणी करून न्यायालयाने आज जामीन मंजूर केले आहे.

जामिन मंजूर होताच राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सोडण्यात आले आहे. कारागृहाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. रमेश कदम राष्ट्रवादीचे माजी आमदार होते. 2014 त्यानंतर 2019 साली तुरुंगात असताना त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून सोलापूरातील मोहोळ या मतदार संघातून निवडणूक लढवली होती.आठ वर्षाच्या कार्यकाळात मोहोळ मतदारसंघात अनेक बदल घडले आहेत. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात मोहोळमध्ये जाऊन राजकीय परिस्थितीची माहिती घेऊन पुढील भूमिका ठरवणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार रमेश कदम यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर दिली.
