डफळापूर उपसरपंचपदी सुनिलबापू चव्हाण क्रांति पँनेलचे गणेश पाटोळे

0
डफळापूर : डफळापूर ता.जत येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनिलबापू चव्हाण क्रांति पँनेलचे गणेश पाटोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दिड वर्षापुर्वी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्या गटाची ग्रामपंचायतीवर सत्ता आली होती.त्यावेळी थेट सरपंच म्हणून सुभाषराव गायकवाड हे विजयी झाले होते.तर ८ सदस्य निवडून आले होते.निवडणूकीनंतर प्रत्येक सदस्यांना सव्वा वर्षाप्रमाणे उपसरपंच देण्याचे ठरले आहे.ठरल्यानुसार वार्ड नं.६ मधिल सौ.मनिषा कांबळे यांना बहुमान मिळाला होता.त्यांचा कार्यकाल पुर्ण होताच त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक झाली.दुसऱ्या टप्यात गणेश पाटोळे यांना संधी देण्यात आली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी श्री.बसरगी यांनी काम पाहिले.

 

सत्ताधारी गटाकडून पाटोळे यांनी अर्ज दाखल केला होता.त्याचबरोबर विरोधी गटाकडून एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होत होती.दरम्यान बहुमाताचा अंदाज घेऊन विरोधी गटाकडून दाखल करण्यात आलेला अर्ज मागे घेण्यात आल्याने गणेश पाटोळे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

निवडीनंतर मावळत्या उपसरपंच सौ.मनीषा दिपक कांबळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पँनेल प्रमुख दिग्विजय चव्हाण, अभिजीत चव्हाण, रमेश चव्हाण, बाळासाहेब चव्हाण,शिवदास शांत,धनाजी चव्हाण,अशोक चव्हाण,दिलीप भोसले,देवदास पाटील आदी प्रमुख मान्यवर व सर्व ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करत गुलालांची उधळण करण्यात आली.

 

Rate Card

प्रथमचं रामोशी समाजाला संधी

डफळापूर ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच पँनेल प्रमुख दिग्विजय चव्हाण यांच्याकडून रामोशी समाजाचे युवा नेते गणेश पाटोळे यांनी उपसरपंचपदी संधी देण्यात आली.प्रथमचं रामोशी समाजाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत होती.

 

डफळापूरच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल गणेश पाटोळे यांचा सत्कार मनिषा कांबळे यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी दिग्विजय चव्हाण, शिवदास शांत रमेश चव्हाण, अभिजीत चव्हाण,सुभाषराव गायकवाड उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.