येथे‌ नगरपरिषदेने महामार्ग केला पांणद रस्ता | सार्वजनिक बांधकाम,राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणांचे‌ सोयिस्कर दुर्लक्ष

0

जत,संकेत टाइम्स : जत शहरातील शिवाजी पेठेतून जाणाऱ्या इस्लामपूर-चडचण या राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झाली असून या महामार्गाचे काम त्वरीत सुरू करण्याची मागणी होत आहे.

जत शहरातील महत्वाचा व सांगली,कोल्हापूर सह अनेक शहरांना जोडणारा महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जत नगरपरिषदेने पाणंद रस्ता करून ठेवला असून नियोजित महामार्ग असतानाही रस्त्याच्या कडेला पक्के अतिक्रमणे करण्यात आली असून येथे व्यवसायिक गाळे काढण्यात आल्यामुळे थेट रस्त्यापर्यत दुकाने 

थाटण्यात आली आहेत. 

त्यापुढे संबधित दुकानाचे ग्राहक रस्त्यावर दुचाकी उभ्या करत असल्याने पाच पाच मिनिटाला रस्ता जाम होत आहे.त्यापलिकडे जात नियोजन शून्य कारभार असणाऱ्या नगरपरिषेदेकडून एक दोन महिन्याला पाईपलाईन दुरूस्तीसाठी रस्ता खोदण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावर एकतर चढे निर्माण होतात. किंवा दोन दोन फुटापर्यत खड्डे पडतात.त्यामुळे चालतही व्यवस्थित जाता येत नाही अशी महामार्ग असणाऱ्या रस्त्याची अवस्था नगरपरिषदेने केली आहे.


सध्या हा रस्ता राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे आहे.त्यांच्या नोंदीप्रमाणे मोठा मार्ग होणे अपेक्षित आहे.मात्र सध्या गटारीच्या पुढे रस्त्यापर्यत पक्के बांधकामे करण्यात आली आहेत. त्याशिवाय गटारी गायब केल्या असल्याने रहिवाशी भागातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते.

राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे वर्ग झाल्याने या महामार्गाचे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे.कवठेमहांकाळ ते जत म.रा.वि.वि.कं.कार्यालयापर्यंत या राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरणाचे काम झाले असलेतरीही जत ते कवठेमहांकाळ दरम्यान अजून काही ठिकाणी हे डांबरीकरणाचे काम अपूर्ण असल्याने हे काम ताबडतोब पूर्ण करावे अशी मागणी वाहनचालकांतून करण्यात येत आहे. 


  
जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठेतील प्रमुख मार्गावरून हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने व या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून त्यामध्ये पाणी साचून राहील्याने वाहनचालकांना या महामार्गावरून आपली वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या मार्गावर अनेक लहान मोठे अपघात ही झाले आहेत.

Rate Card

जत शहरातून जाणारे या महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम जत नगरपरिषद व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे रखडले असून या महामार्गावरून जाणे जत शहरवासियांना अपघाताला निमंत्रण दिल्यासारखेच आहे.त्यामुळे जत शहरवासियातून व वाहनचालकांतून या यंत्रणा विषयी तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.या महामार्गाचे काम तातडीने करण्यात यावे अशी मागणी होत आहे.


नगरपरिषदेचे ढिम्म प्रशासनामुळे रस्त्याची दुरावस्था

जत शहरातील हा महामार्ग खऱ्या अर्थाने यापुर्वी सुसज्ज होणे अपेक्षित होते मात्र नगरपरिषेदेच्या आशिर्वादाने रस्त्यावरील अतिक्रमणे अनेक वेळा संबधित विभागाला रस्त्याचे काम करताना अडचणीचे ठरले आहे. यापुर्वी सार्वजनिक बांधकाम, आता राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना रस्त्यापर्यत आलेली अतिक्रमण हटविण्याचे शिवधनुष्य उचलावे लागणार आहे. स्थानिक नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे असा रस्त्याचा बट्ट्याघोळ झाला आहे.बांधकाम विभागाचा अतिक्रमणाला पाठिंबा


शहरातील नगरपरिषद प्रशासनाच्या आशिर्वादाने शहरभर अतिक्रमणे झाली आहेतच,त्यापलिकडे शहरातून जाणाऱ्या प्रमुख महामार्गावर अगदी रस्त्याला टेकेपर्यत पक्की बांधकामे करून मार्गच गिळकृत्त करण्यात आला आहे.हा सर्व प्रकार बांधकाम विभागाचे अधिकारी डोळे बघत‌ असतानाही त्यांच्याकडून अतिक्रमण धारकांना एक प्रकारे पांठिबा दिला जात आहे. परिणामी नव्याने रस्त्याचे बांधकाम करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यापलिकडे शहराचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे.जत शहरातील प्रमुख महामार्ग असा पांणद रस्ता झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.