महानिर्मितीचा बोर्गी सौर ऊर्जाप्रकल्प कार्यान्वित,५०० कृषी वीज ग्राहकांच्या विजपंपांना मिळणार वीज

0

रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्यामुळे शेतीसाठी दिवसा भरवशाचा वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने महत्वाकांक्षी “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना” सुरु केली.या योजने अंतर्गत २ मेगावाटचा बोर्गी, तालुका जत, जिल्हा सांगली येथील सौर ऊर्जा प्रकल्प २ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी कार्यान्वित करण्यात महानिर्मितीला यश आले आहे.

बोर्गी स्थापित क्षमता २ मेगावाट 

या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे बोर्गी खुर्द या गावातील सुमारे ५०० कृषी वीज ग्राहकांना सौर ऊर्जेचा लाभ होऊन, विशेषतः ५ एच.पी.चे सुमारे ५२० कृषी पंप उर्जित होणार आहेत.

सदर प्रकल्प महावितरणच्या ३३/११ के.व्ही. बोर्गी उपकेंद्राला जोडण्यात आला आहे. ४ हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्प उभारणीचा खर्च सुमारे ८ कोटी इतका आहे. महानिर्मिती, मेसर्स ई.ई.एस.एल.(विकासक), मेसर्स टाटा पॉवर सोलर (सब व्हेंडर) आहेत. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने महानिर्मितीची एकूण सौर ऊर्जा स्थापित क्षमता ३७८.०२ मेगावाट इतकी झाली आहे. ह्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीत गावकऱ्यांचे, स्थानिकांचे, महाऊर्जा आणि महावितरणचे विशेष सहकार्य लाभले.

या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष २० व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. ह्या प्रकल्पातून उत्पादित होणाच्या विजे करिता रु.३.३० प्रती युनिट दराने महावितरण समवेत वीज खरेदी करार करण्यात आला आहे.महानिर्मितीच्या दरीकोन्नूर ६.१६ मेगावाट (तालुका जत, जिल्हा सांगली) येथील सौर ऊर्जा प्रकल्पाची कामे अंतिम टप्प्यात असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

Rate Card

राज्याचे मा.उप मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री तसेच प्रधान सचिव (ऊर्जा) यांचे निर्देशानुसार आणि महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांच्या मार्गदर्शनाखाली महानिर्मितीच्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प कामांना गती देण्यात येत असून महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प) आणि संपूर्ण नवीकरणीय ऊर्जा चमू यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.