शस्ञाने हल्ला करत महिलेला लुटले,भरदिवसा प्रकार

0

जत : जत तालुक्यातील हळ्ळी ते सुसलादला जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेला अज्ञात चोरट्यानी तोंडाला काळे कापड बांधून येऊन शस्त्राने वार करून लुटले. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.नीलक्का चंद्राम बिरादार असे जखमी महिलेचे नाव आहे.

 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हळ्ळी येथील चंद्राम बिरादार यांची सुसलाद हद्दीत शेतजमीन असून, जखमी महिलेचे पती देवदर्शनासाठी परगावी गेले होते तर मुलगा डेअरीला दूध घालण्यासाठी
हळ्ळी गावात गेला होता.शेतामधील घरात पुरुष व्यक्ती नसताना त्यांच्या डोक्यावर शस्त्राने वार करून त्यांना जखमी करून त्यांच्या अंगावरील सोने लुटले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Rate Card

काही दिवसांपूर्वी बेळोंडगी गावाच्या हद्दीतदेखील अशीच घटना रात्रीच्या सुमारास घडली होती.त्यानंतर हळ्ळी परिसरात ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. संख विद्युत वितरणकडून वीजपुरवठा बंद करण्यात आला होता.चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन असे कृत्य करीत असल्याने शेतकरी
रात्रीच्या सुमारास बाहेर जाणे टाळत आहेत.घटना घडल्यानंतर जखमी महिलेला उमदी येथील खासगी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी जत येथे हलविण्याचा सल्ला दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.