डफळापूर येथील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक महाजन परिवारातील हॉटेल मनोहर चे मालक ‘गुुरुपादप्पा (आण्णा) महाजन’ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे,गतवर्षी त्यांचे बंन्धू महानिंग महाजन यांचे निधन झाले होते.याच दोघा बंन्धूनी हॉटेल व्यवसायाला मोठ्या कृष्ठाने प्रसिध्दीच्या शिखरावर आणले होते.खाद्यान्नातील ‘महाजन ब्रँन्ड’ची किमया साधणारे दोघे किमयागार दुर्देव्याने आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
गुरूपादप्पा महाजन यांनी सन 1933 साली दहा बाय दहाच्या खोलीतून सुरू केलेले हॉटेल मनोहर हे आता जत तालुक्यातील प्रसिद्ध हॉटेल बनले आहे.
डफळापूरचा मिसळपाव,मारामारी (चहाचा प्रकार)पेढा ला त्यांनी ब्रँड बनविला आहे. त्यांच्या स्वादिष्ट पुरीभाजी,मिसळपाव,मारामारी पेढा खाण्यासाठी खवव्याची गर्दी असते.प्रचंड कष्ट,दर्जा,क्वालिटी, ग्राहकांचा विश्वास संपादन करत गुरूपादप्पा महाजन यांनी आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण केली होती.सध्या त्यांचे चिरजिंव न नातू हा व्यवसाय संभाळत आहेत.गुरूपादप्पा महाजन यांची गेल्या काही प्रकृत्ती चिंताजनक होती.त्यांच्यावर उपचार सुरू होते.मंगळवार पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली.डफळापूर येथील लिंगायत स्मशाम भूमित प्रचंड लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सलग दुसऱ्या वर्षी डफळापूरमधिल उद्योगी महाजन कुंटुबातील दुसरा तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.गतवर्षीच त्यांचे बंन्धू महानिंग महाजन यांचे निधन झाले होते.
दोघाही बंन्धूच्या आत्म्यास चिरशांती लाभों हि भावपुर्ण श्रंध्दाजली..