जत :खलाटी (ता.जत) येथील शेतकरी
शिवाजी केरू दळवाई यांच्या देशी 23
कोंबड्या बुधवारी (दि.9) दुपारी चार
वाजता मृत्युमुखी पडल्या आहेत.
गुरुवारी दोन पाळीव कुत्र्यांचा मृत्यू
झाला आहे. अजून 10 ते 15 कोंबड्या
अन्नपाणी न खाता पडून आहेत.
कोंबड्या व पाळीव कुत्री यांचा अचानक मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण आहे. यामध्ये आठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
शिवाजी केरू दळवाई हे नाईक
खोराडा वस्तीवर कुटुंबासह राहतात.
शेतीबरोबरच त्यांचा घरगुती देशी
कुक्कुटपालन व्यवसाय आहे. बुधवारी
रात्री कोंबड्या खुराड्यात घातल्या.
सकाळी त्यांना खुराड्यातून सोडले,
त्यावेळी 22 कोंबड्या गुंगी येऊन
थांबलेल्या दिसल्या. दिवसभर त्यांनी
अन्नपाणी खाल्ले नाही. दुपारी चार
वाजता त्यांचा अचानक मृत्यू झाला.
दोन पाळीव कुत्रीही विव्हळताना
दिसली. तीही गुरुवारी सकाळी मृत्युमुखी पडली. अजून 10 ते 15 कोंबड्या अन्नपाणी न खाता गुंगी येऊन थांबलेल्या आहेत.
त्यामुळे हा विषबाधेचा हा प्रकार
असावा, अशी शंका व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती पोलीसपाटील
भाऊसो शेजूळ यांनी जत पोलीस
ठाण्याला, पशुसंवर्धन विभागाला माहिती दिली. शिवाजी दळवाई यांनी फिर्याद दिली आहे. जत पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत कोंबड्यांचे शवविच्छेदन करुन येणार असल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले. यानंतर मृत्युचे कारण स्पष्ट होईल.








