येथे जमीन व्यवहार करण्यात येऊ नयेत,यांनी केले आवाहन

0जत,संकेत टाइम्स : जत नगरिची ग्रामदेवता व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जत येथिल श्री.यल्लमादेवी यात्रेकरिता डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट यांनी अरक्षित केलेल्या जमिनीवर काही लोकांनी प्लॉट पाडून गुंठेवारी जमिनीचे व्यवहार सुरू केले असून कोणीही अशा लोकांशी जमिनीबाबत कसलेही व्यवहार करू नयेत असे आवाहन श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी केले आहे. 

यात्रेकरिता अरक्षित असलेल्या जमिनीवर अतिक्रमणे सुरू असल्याने यापुढील काळात देविची यात्रा भरविण्यात मोठ्या अडचणी निर्माण होणार असून हे होऊ नये यासाठी श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे. 


याबाबत पत्रकारांशी बोलताना श्रीमंत डफळे म्हणाले की,या यात्रेसाठी तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी यानी 150 एकर जागा श्री. यल्लमादेवी यात्रेसाठी अरक्षित करून तसे आदेश डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट ऑर्डर नं.व्ही.पी.टी.एस.आर.24 तारीख  5/8/1954व गव्हर्मेंट जी.आर.नं.पी.एच.डी.2155 तारीख 24/8/1955 चा शासन निर्णय जाहीर केला असून तो आदेश असा आहे.

तरीही काहीजण ही आरक्षित जागा प्लॉट पाडून विकत असल्याचे समोर येत आहे.याबाबत जत येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असून अशा प्रकारे श्री. यल्लमादेवी यात्रेकरिता अरक्षित केलेल्या जमिनी संदर्भात कोणी इस्टेट एजंट यांच्याशी व्यवहार करून त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आम्ही हे आवाहन करित आहोत असेही डफळे म्हणाले. 


Rate Card
यापूर्वी ही जत ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच कै.उदयसिंह संकपाळ यानी जत येथिल श्री. यल्लमादेवी यात्रेकरिता डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट यांनी अरक्षित केलेल्या जमिनिवर कोणीही कोणत्याही प्रकारे कसलेही व्यवहार करू नयेत व यात्रेकरिता अरक्षित असलेल्या जमिनीवर अतिक्रमणे करू नयेत, केल्यास ती अतिक्रमणे बेकायदेशीर समजून ती काढण्याची कारवाई ग्रामपंचायत करेल. अशी नोटीस वृत्तपत्रातून प्रसिद्ध करून जनजागृतीचे काम केले होते. त्यामुळे या जमिनीसंदर्भात कोणीही कोणत्याही प्रकारे कसलेही व्यवहार करू नयेत असे आवाहन श्रीमंत डफळे यांनी केले आहे.

जत येथील श्री.यल्लम्मादेवी मंदिर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.