चारा कटिंग करताना शॉक लागून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पाच्छापूर ता.जत येथे घडली आहे.ओंकार शिवाजी शेळके (वय १५) असे शॉक लागून मृत मुलाचे नाव आहे. गुरुवारी (दि.२८) ही घटना घडली.
पाच्छापूर येथील ओंकार हा इयत्ता नववीमध्ये पाच्छापुर हायस्कूल येथे शिक्षण घेत होता.वाघे वस्ती येथे स्वतःच्या शेतात जनावरांना चारा कट करण्यासाठी मशीन सुरू करत असताना त्याला विजेचा झटका लागला.यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे.या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.पशुधन व्यवसाय वाढत आहे,नवनविन उपकरणे शेतकरी आणत आहेत.मात्र ते चालविताना काळजी न घेतल्याने अशा घटना घडत आहेत.