‘डिजे’च्या दणदणाटात तरूणाचा मृत्यू,गणेश मंडळाच्या ११ जणाविरूध्द गुन्हा

0

इस्लामपूर : सक्त ‌सुचना असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून परवाना नसतानाही ‘डिजे’लावून गणेश विसर्जनाची मिरवणूक काढल्याबद्दल दुधारी ता.वाळवा येथील गणेश मंडळाच्या ११ जणाविरूध पोलीसांना गुन्हा दाखल केला आहे.यावेळी‘डीजे’च्या मोठ्या आवाजाने दुधारी येथील प्रवीण शिरतोडे याचा मृत्यू झाला होता.त्यानंतर विना परवाना मिरवणूक काढली म्हणून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Rate Card
त्रिमूर्ती गणेश मंडळाचे रमजान अल्ताफ मुल्ला, उत्तम वसंत कुंभार, दीपक रामचंद्र कांबळे, योगेश मधुकर गोतपागर, संकेत सूर्यकांत पाटोळे, तानाजी महादेव शिरतोडे, सुशांत पोपट पाटोळे, विशाल नामदेव बनसोडे, विनोद श्रीरंग पाटोळे, महेश जगन्नाथ दळवी (सर्व रा. दुधारी), सुरज कमरुद्दीन मुलाणी (वय २५, रा.बलवडी) यांच्याविरुद्ध पोलीसींनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कमरुद्दीन मुलाणी (एमएच ०९ ए ७७५१)  या नंबरच्या वाहनमध्ये विना परवाना डिजे लावून सार्वजनिक उपद्रव केला व पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या विसर्जन मिरवणूक मार्गावर सार्वजनिक उपद्रव केला.त्यामुळे या सर्वांविरुद्ध हवालदार सचिन यादव यांनी कलम १८८,२९०, २९९, ३४ आणि महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३३(र) (३) / १३१ प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे.

 

सहायक निरीक्षक हरिशचंद्र गावडे पुढील तपास करीत आहेत.दुधारीतील प्रवीण शिरतोडे याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवली आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.आतातरी मंडळाचे कार्यकर्ते बोध घेणार का याकडे बघावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.