अवैध वाळू वाहतूक,ट्रॅक्टर ट्रॉली व वाळूसह ५ लाखाचा मुद्देमाल जप्त

0
4
जत : उमदी पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनावर  पोलिसांनी कारवाई करून एक ट्रॅक्टर, एक ट्रॉली व वाळू असा एकूण पाच लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

सदर कारवाई मध्ये मल्हारी करपे, प्रकाश करपे दोघे रा. पांढरेवाडी व सुरेश कोळी, रा.संख असे तीन इसमानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

सदरची कारवाई उमदी पोलीस ठाणे कडील सपोनि संदीप शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेका कपील काळेल, पोका पोटभरे व पोका चौगूले, चालक पोका सुदर्शन खोत यांचे पथकाने केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here