डफळापूर : डफळापूर येथील श्रीपती कारखान्याचे नाव श्रीपती ठेवण्याचे कारण ते कणखर हाडाचे कष्टकरी शेतकरी होते कदम साहेबांचे वडील व आमचे आजोबा यांना सर्वसामान्य शेतकऱ्याची जाण व तळमळ होती,म्हणून हा श्रीपती कारखाना या भागाचा कायापालट करेल असे प्रतिपादन माजी मंत्री आ.विश्वजीत कदम यांनी केले.
डफळापूर येथील श्रीपती शुगर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ आ.कदम यांच्याहस्ते करण्यात आला.
आ.कदम पुढे म्हणाले,दिवंगत डॉ.पतंगराव कदम यांनी जत तालुक्याच्या विकासासाठी सर्व प्रकारची मदत करण्याची भूमिका घेतली होती व तीच भूमिका आम्ही सर्वांनी घेतली आहे.या भागात रोजगार देणारा मोठा उद्योग उभा रहावा असे,डॉ. कदम साहेबांचे स्वप्न होते ते सत्यात उतरले आहे.
आ.विक्रमसिंह सावंत म्हणाले, दुष्काळग्रस्त भागात रोजगार निर्मिती शेतकरी वर्गाचा सर्वांगीण विकास हे धोरण कारखान्याचे आहे.ऊस लागवडीमध्ये वाढ झाली आहे.पूर्व भागात पाण्यासदर्भात सतत पाठपुरावा करीत आहे आणि त्यासाठी यशस्वी प्रयत्न चालू आहेत असे आ.सावंत म्हणाले.
महेंद्रआप्पा लाड म्हणाले, सोनहिरा,उदगिरी साखर कारखान्या सारखा श्रीपती शुगर हि उत्कृष्ट कारखाना म्हणून नावारूपास येईल.सध्या पाऊस कमी झाल्याने ऊसाचे उत्पादन कमी आहे.तरीही श्रीपती शुगरने ४ लाख मे. टनाचे उदिष्ट ठेवले आहे.गत चाचणी हंगामात ७२ हजार टन गाळप करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा दिवसात ऊस बिल जमा केले आहे.शेतकऱ्यांच्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही,अशा पद्धतीचे चांगले काम या कारखान्या मार्फत केले जाईल तरी यावर्षी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात श्रीपती कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे.यावेळी विजयमाला कदम याच तालुक्यातील आहेत त्यांचे नाव कारखाना परिसराला विजयमाला नगर म्हणून देण्यात यावे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार वनश्री मोहनराव कदम,भारती विद्यापीठाचे कुलपती प्रा.डॉ.शिवाजीराव कदम सर,ऋषिकेश लाड,रोहन लाड, धैर्यशील सावंत,बाबासाहेब माळी, सुभाषराव गायकवाड,गुलाब पांढरे, माणिकराव भोसले, संजय हजारे,उदय शिंदे, प्रा.दादासाहेब ढेरे,बाबासाहेब कोडग तसेच तोडणी वाहतूकदार,परिसरातील शेतकरी बांधव,कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.प्रस्ताविक व स्वागत जनरल मॅनेजर श्री.महेश जोशी यांनी केले व आभार श्री प्रसाद गोकावे यांनी मानले.