सांगलीत आशा,गटप्रवर्तक आक्रमक,परिपत्रकाची होळी

0
सांगली : आशा व गट प्रवर्तक यांनी विविध मागण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून संप पुकारूनही शासन लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर परिपत्रकाची होळी करत,संताप व्यक्त करण्यात आला.आमच्या‌ मागण्या मान्य न झाल्यास यापुढे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष कॉ.मिना कोळी यांनी सांगितले.

Rate Card
राज्यभरातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या 18 ऑक्टोबर पासून आपल्या मागण्या घेऊन बेमुदत संपावर गेल्या आहेत.शासन काय लक्ष द्यायला तयार नाही.एकीकडे शासन असे म्हणते कि, आशा व गटप्रवर्तक या आरोग्य विभागाचा कणा आहे.त्यांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णांना सेवा दिले आहे,असे म्हणतात. दुसरीकडे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या संपावर जाण्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण होतो आहे, म्हणून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या वर कारवाई करण्यात यावी म्हणून शासनाने परिपत्रक काढले आहे.

 

त्या व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रका ची होळी करण्यात येत आहे.आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मागण्या शासनाने लवकरात लवकर सोडण्यात यावे.गटप्रवर्तकांचे  शासकीय सेवेत समायोजन करा,आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना दिवाळी भाऊबीज देण्यात यावी.ऑनलाईन कामाची सक्ती करण्यात येऊ नये.आशा स्वयंसेविका यांना शासकीय सेवेत समायोजन करा.गटप्रवर्तक यांच्या सॉफ्टवेअर भत्ता चालू करण्यात यावा.कॉ उमेश देशमुख,जिल्हा अध्यक्षा कॉ मिना कोळी, कॉ रेहाना शेख, कॉ हणमंत कोळी, सुरेखा जाधव, लता जाधव, अंजू नदाफ, शबाना आगा, सुवर्णा सागर, मंजुषा सांळुखे, वर्षा ढोबळे, शांता जाधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.