जतेत ५ ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व : बिळूर राखले,कोतेंबोबलादही भाजपकडे

कोणबगी, गुलगुंजनाळ, खिलारवाडी येथेही भाजपच्या पँनेलचा विजय

0
जत: रविवारी मतदान झालेल्या जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीचे रविवारी झालेल्या मतमोजणीत पाचही ग्रामपंचायतीवर भाजप प्रणित पँनेलने निर्विवाद सत्ता मिळविली आहे.माजी आमदार विलासराव जगताप या गटाची या निवडणूकीत सरसी झाल्याचे चित्र आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या गटाला या निवडणूकीत अपेक्षित मिळालेले नाही. बिळूर,काेंत्येबाेबलाद कोणबगी, गुलगुंजनाळ, खिलारवाडी या पाचही ग्रामपंचायतीमध्ये  भाजपने यश मिळविले आहे.या विजयामुळे पुढील निवडणूकात चित्र बदलू शकते, हा संदेश दिला गेला आहे.

 

माजी आमदार विलासराव जगताप यांचे गाव असलेल्या काेंत्येबाेबलादची सत्ता भाजपने ताब्यात घेतली आहे. गत निवडणुकीतील पराभव पचवून यंदा एकहाती सत्ता भाजपाच्या समर्थकांनी खेचून आणली आहे. दक्षिण भागातील बिळूर व खिलारवाडी या दोन्ही ग्रामपंचायतीचा निकाल कॉग्रेसला चिंतन करावा लागणारा आहे.एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बिळूर ग्रामपंचायतीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी भाजपने सत्ता राखली आहे.अटीतटीच्या बिळूर ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली पँनेल विजयी झाले आहे.

 

जत पूर्व भागातील तिन्ही ग्रामपंचायतने भाजपला कौल दिला आहे कोणबगी येथे जगताप गटांने सरशी केली आहे. गुलगुंजनाळ ग्रामपंचायत पुन्हा भाजपकडेच राहिली आहे.या विजयामुळे भाजपचे मनोबल वाढले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांना व काँग्रेसच्या विचारधाराला जनतेने नाकारले आहे. विद्यमान आमदार गटाने काेंत्येबाेबलाद,बिळूर ग्रामपंचायत मध्ये ताकद लावली होती परंतु या ठिकाणी काँग्रेसला आठ जागा मिळाल्या आहेत तर भाजपला नऊ जागा व सरपंच पद मिळाले आहे.

 

विजयी सरपंच
काेंत्येबाेबलाद : राणी मुरलीधर जगताप विजयी सरपंच (एकहाती सत्ता भाजप)
बिळूर : विद्याश्री लक्ष्मण जखगोंड सरपंच भाजप
खिलारवाडी : द्रोपदी धुळा लोखंडे सरपंच भाजप
गुलगुंजनाळ : राणी दामाजी माने सरपंच भाजप
कोणबगी : सरस्वती अमोगसिद्ध बिरादार सरपंच भाजप
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.