जत : जत तालुक्यातील १० गावातील 4 कोटी 32 लाख रु.च्या विकासकामांचे भूमिपुजन आ.विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. २५/१५,नाबार्ड आणि आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत मंजूर करणेत आलेल्या जत तालुक्यातील जत,वाषाण,कंठी,कोसारी,हिवरे अंकले,बाज,बेळूंखी,डफळापूर,शे ळकेवाडी,खलाटी या गावांतील विकास कामांचे भूमिपुजन करण्यात आले.यावेळी जत तालुका कॉंग्रेस पक्षाचे सर्व नेते,नगरसेवक,पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जत मधील राजे रामराव महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता १५ लक्ष,वाषाण -कंठी- बागेवाडी रस्ता सुधारणा करणे २० लक्ष, कोसारी ते गुळवंची रस्ता डांबरीकरण करणे २६० लक्ष,हिवरे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सभामंडप बांधणे १०.००,अंकले येथील अहिल्यादेवी होळकर चौक सुशोभिकरण करणे. बाज येथील साकळी सुलतान पिर दर्गा संरक्षण भिंत बांधणे.८ लक्ष,बेळूंखी सिद्धनाथ मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे.८ लक्ष रु, डफळापूर येथील रोहिदास नगर येथील रणधीर संकपाळ घर ते गणपत संकपाळ घर रस्ता पेव्हिंग ब्लॉक बसविणे. ८ लक्ष रु.,डफळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र विस्तारीकरण ६६ लक्ष ,शेळकेवाडी फाटा ते शिंगणापूर रोड पर्यंत रस्ता खडीकरण मुरमिकरण करणे. १० लक्ष,खलाटी येथील बनकर नडागट्टे वस्ती रस्त्यावर सी.डी.वर्क बांधकाम करणे.आदी कामांचा एकूण तीन कोटी ६३ लाख रुच्या विकासकामांचे आज उद्घाटन करणेत आले.
या कोट्यावधी रु.च्या रस्ते,पेव्हिंग ब्लॉक,सभामंडप,संरक्षण भिंत अशा विकास कामांमुळे या गावांचा सर्वांगीण विकास होणार आहे.यावेळी आ.विक्रमसिंह सावंत यांच्यासोबत श्रीमंत शार्दुल राजे डफळे,महादेव पाटील,कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडगसह जत पश्चिम भागातील कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.