महाराष्ट्राच्या बाटलीत गोव्याची दारू,सावळजच्या हॉटेलात राजरोस प्रकार,तिघांना अटक

0
विटा : महाराष्ट्रात बंदी असतानाही गोवा बनावटीची विदेशी दारू राज्यातील विदेशी मद्याच्या बाटलीत भरून त्याची बेकायदा विक्री करणाऱ्या तासगाव तालुक्यातील सावळज येथील हॉटेल फिनिक्सवर विट्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकत गोवा बनावटीची दारू, बॉटलिंग उपकरण, बाटल्यांची बनावट झाकणे यासह सुमारे ४ लाख २४ हजार ८९५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी दोन संशयिताना ताब्यात घेतले आहे. विनोद विठ्ठल माने (वय ३७, रा. माने वस्ती येळावी, ता.तासगाव), सुशांत अशोक गायकवाड (२७, रा. गायकवाड मळा, बस्तवडे, ता. तासगाव) व गणेश मालोजी शिंदे (२४,  रा. दहिवडी, ता.तासगाव) या तिघा संशयितांची नावे आहेत.

सावळज येथील फिनिक्स हॉटेलवर गोवा बनावटीची दारू महाराष्ट्र राज्यात विक्री होणाऱ्या बाटलीत भरून त्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती विटा उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी मिळाली होती. त्याआधारे पथकाने सावळज येथील फिनिक्स हॉटेलवर छापा टाकला. यावेळी या पथकाला हॉटेलच्या पाठीमागे पत्राच्या शेडमध्ये तसेच किचन भट्टीला लागून असलेल्या भूमिगत पाण्याच्या रिकाम्या टाकीत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या १८० मिलीच्या ८९४ व मोठ्या ७५० मिलीच्या १५० बाटल्या सापडल्या.

पथकाने हॉटेलची झडती घेतली असता बॉटलींग उपकरणे, बाटल्याची बनावट बुचे, गोव्याची दारू भरण्यासाठी आणलेल्या व महाराष्ट्रात विक्री होणाऱ्या रिकाम्या ७२ बाटल्या, मोबाईल, गाळणी, प्लॉस्टिक कॅन यासह सुमारे ४ लाख २४ हजार ८९५ रूपयांचा मुद्देमाल जप्त असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित तिघांना अटक करण्यात आली आहे.विटा उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विजय मनाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.