जत : उटगी ता.जत येथील मुंबई महालक्ष्मी अर्बन को.क्रेडिट सोसायटीस नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.उटगी येथे नव्याने ही सोसायटी सुरू होत आहे.परिसरातील छोटे व्यवसायिक,उद्योजक व हातगाडी चालक व्यापाऱ्यांना यापुढे या संस्थेच्या माध्यमातून आर्थिक हातभार मिळणार आहे.संस्थेस नोंदणी प्रमाणपत्र सा.निंबधक अमोल डफळे यांच्याहस्ते सुपुर्द करण्यात आले.
ऑडिटर सुरेश सायगाव,कार्यालयातील अधिकारी चेतन जावीर,मल्लेश कोळी,व मान्यवर उपस्थित उपस्थित होते.
यावेळी संचालक सिंदलिगप्पा केंशगोंड,मल्लिकार्जुन बालगाव,श्रीमंत कट्टीमनी,लक्ष्मण माळी,हणमंत हुगार,शरणया हिरेमठ,निलाप्पा कोळी,सोंमनिंग चिंतामणी,परशुराम बालगाव,महादेवप्पा जावीर,दयानंद हंजगी,सुधाकर बिराजदार,प्रकाश रेवी हे संचालक उपस्थित होते.