जतच्या २९ गावासाठी स्वतंत्र जलजीवन मिशन पाणी योजना राबवा

0
जत :  मुंबई येथे जत तालुक्यातील 29 गावासाठीची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना रद्द करणेबाबत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात बैठक पार पडली.यावेळी बैठकीला समवेत पाणीपुरवठा विभागाचे सर्व सचिव ,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी,जिल्हा परिषद सांगलीचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

29 गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना रद्द करून या 29 गावांसाठी स्वतंत्र जलजीवन मिशन पाणी योजना राबविण्यात यावी व प्रादेशिक पाणी योजना रद्द करावी असे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी ठणकावून सांगितले. येत्या 15 दिवसात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, 29 गावाचे सरपंच या योजनेच्या पाणी स्त्रोतांची पाहणी करून अहवाल तयार करतील व निर्णय घेण्यात येईल असेही बैठकीत ठरले आहे.यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत,आमदार गोपीचंद पडळकर,जत तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी,वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.