डफळापूर : श्रीपती शुगर अँण्ड पॉवर लि. डफळापूर कारखाना २०२३-२४ या चालू हंगामाकरिता भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे व्यापक हित लक्षात घेऊन ऊस एकरकमी दर ३०००/- रुपये प्रती मे.टन देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी दिली.याबाबत आ.डॉ.विश्वजीत कदम म्हणाले कि,श्रीपती शुगर ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताला प्राधान्य देणार असून मागील चाचणी गळीत हंगामात एकरकमी २८०० रुपये दर देऊन वेळेत ऊस उत्पादक शेतकरी यांचे बँक खातेवरती रक्कम जमा केली आहे.
कार्यक्षेत्रात ऊसतोडणी मजूर दाखल होऊन गळीत हंगाम सुरु झाला असून ४ लाख मे. टनाचे उदिष्ट ठेवले आहे. तरी जास्तीत जास्त प्रमाणात श्रीपती शुगरला ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन आ.डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत,श्रीपती शुगरचे कार्यकारी संचालक व जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड,भारती शुगरचे चेअरमन ऋषिकेश लाड, जनरल मॅनेजर महेश जोशी, शेती अधिकारी हनमंत धारीगौडा उपस्थित होते.