म्हैसाळचे रब्बी आवर्तन सुरू,10 डिसेंबर पर्यंत केवळ जत कालव्याच्या लाभक्षेत्राला मिळणार पाणी

0

म्हैसाळ योजनेच्या रब्बी आवर्तनाचा
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

सांगली : कालवा सल्लागार बैठकीत नियोजन केल्यानुसार आज म्हैसाळ योजनेच्या रब्बी आवर्तनाचा म्हैसाळ प्रकल्पाच्या पंप गृह क्र.१ येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार संजय पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित कोरे व श्री. पवार उपस्थित होते.

कडेगाव उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यात

Rate Card

रब्बी आवर्तनामध्ये म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये पुच्छ भाग ते शीर्ष भाग (Tail to Head) धोरणाअन्वये पाणी देण्यात येणार आहे. 10 डिसेंबर पर्यंत केवळ जत कालव्याच्या लाभक्षेत्राला जत, सांगोला, मंगळवेढा भागाला पाणी देण्यात येणार असून तदनंतर 10 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी पर्यंत लाभ क्षेत्रातील विविध कालव्यांना नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.