जत : जत तालुक्यातील उद्योजक नाबिलाल मुजावर यांनी सुरू केलेल्या नाशिक येथील शिंदे एमआयडीसी मधिल नॅशनल अग्रो पॉलिक्लिनिक कारखाना,
अत्याधुनिक प्रयोगशाळा व मशिनरी,कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांच्याहस्ते संपन्न झाले.
जत सारख्या कायम दुष्काळी असणाऱ्या तालुक्यातून एक युवक नोकरी साठी नाशिकला येतो आणि स्वतःच्या जिद्दीवर प्रामाणिक आणि कष्टावर मोठा उद्योग उभा करतो याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.स्वतः नोकरीनिमित्त येतो आणि अनेक जणांना नोकरी देतो याच्या पाठीमागे त्यांचे योगदान खूप मोठं आहे.
त्यांनी रोप लावलं आहे आता झाड झालं आहे.भविष्यात वटवृक्ष होईल याची खात्री आहे,असे गौरवपूर्ण उद्गार जमदाडे यांनी यावेळी काढत,पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नाशिक मनपाचे नगरसेवक अशोक सातभाई,द्राक्ष बागायतदार संघ नाशिकचे अध्यक्ष रविंद्र निमसे,राहूरी विद्यापीठाचे ऑफिसर सुरेश कांबळे,ग्रा.प.शिंदेचे सरपंच गोरख जाधव,जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील,श्रीमंत पाटील, मोहन कुलकर्णी,रवींद्र सावंत, सीताराम गायकवाड आदी मान्यवर,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.